करा अजून गर्दी....उद्या पासून परत परभणीत कर्फ्यु

परभणी जिल्ह्यातील नागरी भागासह परिसरात
दोन दिवसीय संचारबंदी लागू

 परभणी, दि.22 (प्रतिनिधी) :-  परभणी महानगरपालिका हद्द आणि 5 किमी परीसर तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिका हद्दीमध्ये व त्यालगतच्या 3 किमी परीसरात कलम 144 नुसार बुधवार दि . 22 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री पासून ते दि. 24 एप्रिल 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
     या संचारबंदीतुन  सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने , सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक , वार्ताहर , प्रतिनिधी , वितरक तसेच  पेट्रोलपंप वितरक , कर्मचारी व त्यांची वाहने  आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी 6  ते 9  या वेळेत दूध विक्री करावी.  खत वाहतूक त्यांची गोदामे व दुकाने तसेच त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार आदी व्यक्ती, समुहाला सुट राहील.
       वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये , घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक परभणी,  महानगरपालिका आयुक्त , सर्व उपविभागातील  उपविभागीय दंडाधिकारी , अन्न व प्रशासनाचे सहाय्यक, सर्व तालुका दंडाधिकारी यांच्यावर राहील. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.
                      

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन