केशरी शिधापत्रिका धारक नागरिकांना मिळणार धान्य - राज्य शासनाची घोषणा

केशरी शिधापत्रिका धारक नागरिकांना मिळणार सवलतीच्या दरात धान्य राज्य सरकारची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था):- राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार केशरी रेशन कार्डधारकांना एक मेपासून स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप केले जाणार आहे. स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत.
केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतील अन्नधान्याचा लाभ मिळत नाही.अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्यांचे धान्य मिळणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केंद्रीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून धान्याची उचल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून ई-पॉस मशीनद्वारे तांदळाचे वितरण करायचे आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरविलेल्या दराने अन्नधान्य देण्यात यावे. अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदराने शिधापत्रिकेचा क्रमांक , त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील या बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी. त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ग्राहकास रितसर पावती देण्याच्या सूचना शासनाने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. अन्नधान्य वाटपामध्ये गैरव्यवहार होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन