सोलापुरात स्वस्त धान्य दुकानावर कारवाई - गडबड करताना 3 दुकाने सापडली


स्वस्त धान्य दुकानांवर अन्नधान्य वितरण कार्यालयाची कारवाई


सोलापूर २० एप्रिल (वृृत्तसंस्था):- दळणवळण बंदीच्या कालावधीत शिधापत्रिका धारकांना घेतलेल्या धान्याची ३ स्वस्त धान्य दुकानदारांनी पावती दिली नाही. या प्रकरणी ३ दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील गंगामाई महिला बचत गट आणि पी.एस्. लोकरे यांच्या स्वस्त भाव दुकानांचे परवाने रहित करण्यात आले. धान्य वाटपात अनियमितता, मूळ शिधापत्रिका आणि ‘ऑनलाईन’ शिधापत्रिका यांच्या नावात पालट, अशा त्रुटींमुळे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन