परभणीत 1 लाख 41 हजार शिधापत्रिका धारकांना तांदूळ वाटप करण्यात आला

जिल्हयात 1 लाख 41 हजार       शिधापत्रिकाधारकांना मोफत  तांदळाचे वाटप  - जिल्हाधिकारी

परभणी, दि.21 (प्रतिनिधी) :-  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपास जिल्ह्यात प्रारंभ झाला असून प्रतिलाभार्थी पाच किलो तांदुळ देण्यात येत आहेत. तरी आजपर्यंत जिल्हयात 1लाख 41हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप पूर्ण झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली आहे. 
           परभणी जिल्हयात अंत्योदय योजनेअंतर्गत 43 हजार 879 पात्र शिधापत्रिकाधारक असुन प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 2 लाख 5 हजार 605 तर एपीएल शेतकरी योजनेत 56 हजार 196 पात्र शिधापत्रिकाधारक आहेत . असे  तीनही योजनांसाठी पात्र कार्डधारकांची एकुण संख्या 3 लाख 5 हजार 680 इतकी असुन त्यावरील लाभार्थी संख्या 14 लाख 52 हजार 932 इतकी आहे. नियमित धान्य वाटप जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असुन 6 हजार 150 मे . टन धान्य पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेले आहे.
            मोफत तांदुळ वाटपास प्रारंभ झाला असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. एका शिधापत्रिकेत पाच नावे असल्यास त्यांना 25 किलो तांदूळ देण्यात येत आहे . मोफत तांदूळ वाटपात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत मोडणाऱ्या कार्डधारकांनाच धान्य देण्यात येत आहे . मोफत तांदूळ योजनेत एपीएल योजनेत मोडणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश नाही , प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत परभणी जिल्हयासाठी 6 हजार मे. टन तांदूळ प्राप्त झाला असून आज पर्यंत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना मोफत तांदूळ प्राप्त झाला असुन स्वस्त धान्य दुकानदारामार्फत पात्र लाभार्थ्यांना 3 हजार 577 मे . टन ( 59 % ) धान्य वितरीत करण्यात आलेले आहे. तसेच  टप्प्याटप्प्याने स्वस्त धान्य दुकानदारांना तांदूळ वाटप करण्यात येत आहे . मोफत तांदूळ वाटप चालू होत असताना प्रत्येक प्रत्येक गावात तशी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे . कोणते धान्य नियमित आहे व कोणता तांदूळ मोफत देण्यात येत आहे , याची नागरिकांना सूचना देणे आवश्यक आहे . नाही तर नियमित धान्य वाटप व मोफत तांदूळ वाटपात गोधळ होवू नये यासाठी गावातील ग्राम दक्षता समिती तसेच शासकीय प्रतिनीधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जागरुक युवकांनी व नागरिकांनीसुध्दा याकडे लक्ष दिल्यास वाटपात गैरव्यवहार होणार नाहीत .           
        तालुक्यात अंत्योदय, प्राधान्य व एपीएल शेतकरी योजनेत मोडणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना नियमाप्रमाणेच धान्य वाटप जवळपास पूर्ण झाले असून आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना ५ किलो  मोफत तांदूळ वाटप करण्याचे काम चालू आहे.  धान्य वाटपाबाबतचे रास्तभाव दुकानाबाहेर फलक लावण्यात येत आहेत तसेच परभणी जिल्हयातील उर्वरित एपीएल केशरी शिधापत्रिका 78 हजार 119 असुन त्यावरील 3 लाख 36 हजार 771 लाभार्थ्यांसाठी माहे मे व जून , 2020 या दोन महिन्यासाठी प्रतिमाह गहू 1010 मे . टन व तांदूळ 674 मे.टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे.  हे धान्य प्रति लाभार्थी 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो दराने व प्रति लाभार्थी 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने माहे मे व जून , 2020 या दोन महिन्यात रास्तभाव दुकानदारामार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. असेही जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन