गोवा कोरोनामुक्त : शेवटच्या रुग्णाचा चाचणी अहवालही ‘निगेटिव्ह'

गोवा कोरोनामुक्त : शेवटच्या रुग्णाचा चाचणी अहवालही ‘निगेटिव्ह'
कोरोनाबाधित रुग्ण नसला, तरी ३ मेपर्यंत दळणवळण बंदी रहाणार असून लोकांचे सहकार्य आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
पणजी (वृत्तसंस्था) – गोव्यात शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णाचा चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. गोव्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ वरून शून्यावर आल्याने मला आनंद होत आहे. यासाठी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो. राज्यात आता कोरोनाबाधित एकही रुग्ण नसला, तरी ३ मेपर्यंत राज्यात दळणवळण बंदी लागू रहाणार आहे. दळणवळण बंदीतील नियमांचे काटेकोरपणे पालन करून लोकांनी सहकार्य करावे. दळणवळण बंदी संपेपर्यंत गोव्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडू नये, याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज