भगवान श्री परशुराम जयंती उत्साहात साजरी-विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले

भगवान श्री परशुराम जयंती निमित्त पोलीस कर्मचारी व मनपा कर्मचारी याना सॅनिटाईजर चे वाटप
 गरजवंतांना अन्नदान प्रसाद वाटप उपक्रम घेण्यात आला
ब्राहमण एकता मंच, सावरकर विचार मंच, म. श. शिवणकर प्रतिष्ठान, संत कवरराम संघ,लायन्स क्लब प्रिन्स,अन्नदान प्रसाद वाटप करीता यांचे मिळाले विशेष सहकार्य.


*परभणी(प्रतिनिधी):- भगवान श्री परशुराम जयंती निमित्त परभणी जिल्हा ब्राहमण महासंघ च्या वतीने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे व या कामात पोलीस कर्मचारी हे मोठी भूमिका निभावत आहेत त्यांना सुरक्षेचे दृष्टीने जयंतीचे औचित्य साधून बंदोबस्त कमी असलेले पोलीस कर्मचारी व मनपा स्वच्छता कर्मचारी यांना हॅण्ड सॅनिटाईजर चे वाटप करण्यात आले या उपक्रमाची सुरवात परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्णकांत उपाध्याय यांचे हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी सर्वाना परशुराम जयंती च्या शुभेच्छा दिल्या व नन्तर नवा मोंढा पोलीस ठाणे, नानलपेठ पोलीस ठाणे, कोतवाली पोलीस ठाणे मधील बंदोबस्त कामी असलेले पोलीस कर्मचारी याना हॅण्ड  सॅनिटाईजर चे वितरण करण्यात आले तसेच मनपा च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील सॅनिटाईजर देण्यात आले यात विशेष बाब नवा मोंढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री तट यांनी स्वतः यात सहभागी होऊन जागोजागी बंदोबस्त कामी उपस्थित पोलीस कर्मचारी यांना सॅनिटाईजर वाटप करण्यास विशेष सहकार्य केले
26 एप्रिल रोजी सावरकर विचार मंच, म.श.शिवणकर प्रतिष्ठाण,संत कवरराम संघ,लायन्स क्लब प्रिन्स,ब्राहमण एकता मंच यांचे सहकार्याने भगवान श्री परशुराम व भगवान श्री बसवेश्वर यांचे जयंती निमित्त अन्नदान प्रसाद वाटप उपक्रम घेण्यात आला या करिता मंदार कुलकर्णी सचिन दैठणकर सचिन सरदेशपांडे, प्रमोद वाकोडकर, मकरंद कुलकर्णी स्वप्नील पिंगळकर, संजय चौधरी, समंदरसिंग राजपुरोहित अभिजित सराफ, योगेश जोशी, अमित पाचपोर, सचिन शेटे , धनंजय जोशी, नकुल शुक्ल, अभिजित सराफ,संतोष पाठक, विलास कौसडीकर, शँकर आजेगावकर आदी ब्राहमण व वीरशैव समाज बंधू उपस्थित होते

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन