परभणीत उद्या 20 एप्रिल रोजी फक्त अत्यावश्यक सेवा व दुकाने सकाळी 7 ते दु 2 पर्यंत चालू राहतील

परभणी शहरातील नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी  २० एप्रिल रोजी सकाळी ७  ते दुपारी २ या कालावधीतच करावी
(घरपोच वृत्तपत्र वाटप बंद राहील)

         परभणी दि.19 (प्रतिनिधी) :- राज्य शासनाने करोना विषाणूचा ( कोव्हीड १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक करणेसाठी राज्य शासनाने दिनांक  १७ एप्रिल २०२०  सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , परभणी करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात दिनांक ३ . मे २०२० पर्यंत पूर्ण लॉकडाऊन घोषित केलेले आहे . परभणी शहर महानगरपालिका हद्दीमध्ये एक रुग्ण करोना बाधित आढळल्याने परभणी शहर व तीन किमी च्या परिसरात दिनांक . १९ एप्रिल २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती .  परभणीत असे निदर्शनास आले आहे की , नागरिकांची अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गैरसोय होण्याची शक्यता आहे . त्यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , परभणी आदेशीत केले की , परभणी शहरातील नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदी दिनांक २० एप्रिल २०२० रोजी सकाळी ०७ . ०० ते दुपारी ०२ . ०० या कालावधीतच करावी . 
      या कालावधीत फक्त दुध विक्री , फळे व भाजीपाला विक्री , किराणा दुकाने , पेट्रोलपंप ,गॅस व औषधी दुकाने ही दुकाने चालू राहतील . ईतर सर्व दुकाने या कालावधीत बंद राहतील . जिल्ह्यात ईतर सर्व ठिकाणीसुद्धा वरील कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेचीच दुकाने चालू राहतील . व ईतर सर्व आस्थापना बंद राहतील परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी , अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अन्यथा जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ आदेशाचे पालन न करणा - या नागरिकांवर कडक कार्यवाही करण्यात येईल . असे जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज