रंगाचे झोन पाहून खुश होऊ नका.....घराबाहेर पडू नका....युद्ध अंतिम टप्प्यात आहे


राज्यात 3 झोन केले आहेत....नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी नाही बर का
झोनचे रंग पाहून खुश होण्याची गरज नाहीये....जो पर्यंत कोरोना 19 प्रभाव संपत नाही तो पर्यंत नागरिकांनी लॉक डावूनचे व सुरक्षा उपाय करावेत.
महाराष्ट्र(वृत्त):- आज विविध वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या द्वारे राज्यात झोन निर्माणची बातमी वाऱ्यासारखी पसरली ज्यात लाल केशरी हिरवा अश्या रंगाने राज्यातील जिल्हे दर्शविण्यात आले आहेत . 
नागरिकांना वाटले की आपला जिल्हा लाल रंगाचा नाहीये ना मग चला टेन्शन मिटले आता कोरोनाला घाबरायची गरज नाही लागा आपापल्या रोजच्या कामाला ....परंतु थांबा ....नागरिकानो या रंगाचा अर्थ तुमच्या रोजच्या कामाशी नाहीये ....आणि तुम्हाला बाहेर फिरण्याचा परवाना देखील नाही बर का.....सावधान
सध्या संपूर्ण देश कोरोना 19 च्या संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे अनेक नागरिक या विषाणूच्या संक्रमण झाल्याने मृत्युमुखी पडले आहे. संपूर्ण देशात संचारबंदी (लॉक डाउन) 14 एप्रिल पर्यंत सरकारने घोषणा केली. त्यामुळे देशात व राज्यात परिस्थिती नियंत्रणात आणणे सोपे झाले.परंतु काही घटना पाहता राज्यातील प्रमुख शहरात कोरोनाने कहर केला आहे मुंबई पुणे ठाणे रायगड सांगली पालघर औरंगाबाद नागपूर जिल्हे अजूनही कोरोना प्रभावित आहेत.तसेच बाकीच्या जिल्हयातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने जिल्हाबंदीचे उपाय केले जात आहेत.सरकारने राज्यातील कोरोना प्रभावित जिल्हे व कोरोना नियंत्रित जिल्हे व कोरोना प्रभाव नसलेले जिल्हे यांना लाल केशरी हिरवा रंग देऊन झोन दर्शविले आहे याचा अर्थ असा नाही की कोरोना 19 विरुद्ध आपण युद्ध लढत होतो आणि आता ते युद्ध संपले आहे सगळे काही ठीक झाले आहे असा नसून केवळ राज्यातील कोणत्या जिल्ह्याची कोरोना 19 च्या रुग्ण संख्येनुसार राज्याची तीन झोन मध्ये विभागणी केली गेली आहे. ज्यात 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेले जिल्हे लाल रंगाने दर्शविले आहे तर 15 पेक्षा रुग्ण कमी असलेले जिल्हे केशरी रंगाने दर्शविले याचबरोबर एकही रुग्ण नाही अश्या जिल्हाना हिरवा रंगाणे दर्शीवले गेले आहे याचा आणि आपल्या मुक्तपणे बाहेर फिरण्याचा काही एक संबंध नसून नागरिकांनी आरोग्य विभागाने ज्या काही सूचना दिल्या त्याप्रमाणे नागरिकांनी केवळ आणि केवळ घरी बसून रहाणे व वेळो
वेळी स्वच्छता उपाय करणे आवश्यक आहे तसेच आपले काम घरी बसून होत असेल तर वर्क फॉर्म होम करावे.कोरोना 19 चा प्रभाव कायम नष्ट होई पर्यंत नागरिकांनी अतिउत्साहात नियंत्रणात आलेली परिस्थिती गर्दी करून अथवा बाहेर पडून बिघडवू नये ही अपेक्षा आहे

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन