औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते शासकीय वाहनातून मद्य नेतांना पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते  शासकीय वाहनातून दारू नेतांना पोलिसांच्या ताब्यात

एकीकडे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत असतांना दुसरीकडे पराकोटीची असंवेदनशीलता आणि दायित्वशून्यता असणारे असे शासकीय अधिकारी कसे जनहीत साधणार  ?

 जालना – औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते (वय ४३ वर्षे) यांना ‘आरोग्य सेवा’ असा फलक लावलेल्या शासकीय वाहनातून ६ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम आणि ६ हजार रुपयांचे विदेशी मद्य घेऊन जातांना पोलिसांनी जिल्ह्यातील वरूडी पडताळणी चेकपोस्टवर पकडले. ही घटना १८ एप्रिल या दिवशी दुपारी १.३० वाजता घडली. वाहनाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि विदेशी मद्य यांविषयी विचारलेल्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. प्राथमिक चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहनासह रोख रक्कम आणि विदेशी मद्य असा एकूण १२ लाख ७६ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. 
औरंगाबाद क्षेत्रातून पोलिसांनी त्यांना कसे सोडले ? औरंगाबाद आणि जालना संयुक्त पडताळणी नाक्यांवरूनही त्यांनी गाडी पुढे नेली कशी ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न