मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी DD सह्याद्रीवर जाहिरात करावी - शिवसेना नेते संजय राऊत

पंतप्रधान निधीसाठी डीडी नॅशनलवर जाहिरात होतीये मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी डी डी सहयाद्री वर का होऊ नये जाहिरात - शिवसेना नेते संजय राऊत
मुंबई (वृत्त संस्था):-   कोरोना महामारीने सगळा देश त्रस्त झाला आहे. सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर मोठं काम करते आहे. पण यामध्ये लोकांनी देखील आर्थिक मदत करून आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. पंतप्रधान निधीमध्ये आपली रक्कम जमा करण्याचं आवाहन मोदी करत आहेत. तर विविध राज्य सरकारं त्यांच्या त्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याचं आवाहन करत आहे. याच रिलीफ फंडावर आणि त्याच्या जाहिरातबाजीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
डीडी नॅशनल वर पंतप्रधान निधीसाठी जाहिरात होत आहे मग राज्य सरकारला डीडी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीरात करायला काय हरकत आहे?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करून डीडी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जहिरात का करू नये, असं म्हटलं आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन