शिया रवी ठाकूर या चिमुकलीने अन्नदान उपक्रमास परदेशातून पाठवले आपले खाऊचे पैसे रुपये 2100

सावरकर विचार मंचच्या मोफत अन्नदान उपक्रमास 
शिया ठाकूर चिमुकलीने ग्लासगो स्कॉटलँड (युके) येथून नोंदवला आर्थिक सहभाग
परभणी (प्रतिनिधी):- सम्पूर्ण देशात कोरोना 19 आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाउन घोषित केले गेले त्यादिवसापासून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेने सावरकर विचार मंच ने गरजवंत लोकांना जेवणाची व्यवस्था करण्याचा उपक्रम राबवण्याचे ठरवून शहरात उपक्रम सुरू केला मंचच्या या कार्यात शहरातील म.श. शिवणकर प्रतिष्ठान,संत कवरराम सेवा मंडळ, वुई केअर फाउंडेशन,लायन्स क्लब प्रिन्स परभणी आदी सारख्या संस्था तन मन धन रूपाने सामील झाल्या.  आजही हा उपक्रम मोठ्या उत्साहात चालू आहे शेकडो गरजवंत लोकांना घरपोच मोफत तयार जेवण पोहचवण्यात येत आहे या उपक्रमाला सर्व ठिकानाहून मदतीचा ओघ सुरू आहे अनेक लोक विविध प्रकारे या उपक्रमात सहभागी होत आहेत.
असेच या उपक्रमात परभणी येथील मूळ रहिवासी असलेले सध्या कामा निमित्ताने परदेशात ग्लासगो स्कॉटलँड (युके) येथे वास्तव्यास असलेले रवी ठाकूर यांच्या मुलीने शिया ठाकूर (वय 8 वर्ष ) आपल्या पिगी बॅंकेत खाऊ करीता साठवलेले  2100 रुपये आर टि जि एस द्वारे सावकार विचार मंच च्या मोफत अन्नदान या उपक्रमाला देणगी स्वरूपात देऊन स्वतः चा सहभाग नोंदवला तिने एवढा लहान वयात आपल्या देशातील नागरिकांच्या मदतीसाठी विचार करून खाऊचे पैसे अन्नदान कार्यक्रमास दिले याबद्दल सावरकर विचार मंचच्या वतीने तिचे कौतुक करण्यात आले तिला यासाठी संजय रिझवानी यांनी मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन