ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांची प्राथमिक तपासणी :डॉ. खा. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांची प्राथमिकतपासणी :डॉ. खा. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम
मुंबई(वृत्तसंस्था) : सर्वसामांन्य माणूस घरात असला तरी पत्रकार आणि पोलीस सामांन्यांसाठी रस्त्यावर आहेत.. सरकारने पोलिसांना विमा कवच आणि मदत देण्याचे जाहीर केलेले आहे.. मात्र पत्रकारांना कोणतेच संरक्षण नाही..मालक राबवून घेत आहेत आणि पत्रकारांसाठी काही करावं असं सरकारला वाटत नाही.. या पार्श्‍वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचयावतीने ठाणे जिल्ह्यातील पत्रकार आणि पोलिसांची थर्मल स्कॅनरच्या मदतीने  कोविडची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे.. एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत आज या तपासणी मोहिमेस सुरूवात झाली.. आज २०० पत्रकार आणि पोलिसांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.. स्वतःखा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरांच्या भूमिकेत जाऊन तपासणी केली..ठाणे, कळवा, मुंब़ा उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली आदि ठिकाणच्या पत्रकारांनी याचा लाभ घेतला.. 
पत्रकारांची मोफत प्राथमिक तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एकनाथराव शिंदे, खा. डॉ श्रीकांत शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.. शिवसेना आरोग्य कक्षाचे मंगेश चिवटे यांनी याकामी पुढाकार घेतल्याबद्दल परिषदेने त्यांनाही धन्यवाद दिले आहेत..

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन