एस टी ची सॅनिटाईजर बस ....कर्मचाऱ्याने लढवली आयडिया...कशी बनवली वाचा

एसटीची सॅनिटायझर बस ... कशी बनवली वाचा

आपल्या एस टी चे कर्मचारी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चालक व वाहक व इतर कर्मचारी यांना सॅनिटाईजर व्हॅन तयार केले तेही अतिशय कमी वेळात व उपलब्ध साधनांचा वापर करून कसे केले वाचा 
         एक मसेज मोबाईल आला . त्यामध्ये कर्नाटक एसटीच्या सॅनिटायझर बस बद्दल माहिती होती. त्यांनी त्यांच्या राज्यासाठी हि बस बनवली होती. लगेच मनात विचार आला जर कर्नाटक एसटी करू शकते तर महाराष्ट्र एसटी का नाही ? लगेचच ह्या संदर्भातला मेसेज माझ्या अभियांत्रिक मित्रांच्या ग्रुप वर टाकला. आणि त्यांनी मार्गदर्शन केले. तसे पाहता ही सिस्टिम बनवणे सोपे आहे. परंतु मुख्य आव्हान होते "लॉकडाऊन".  मित्रांनी सांगितलेले सेन्सर्स ,फॉगर्स,  पाईप्स  मोटर इत्यादी  सामान मिळणे खूपच कठीण होते . तरी हे आव्हान घेऊन मी लगेच एसटीचे महाव्यवस्थापक राहुल तोरो सरांशी संपर्क साधला आणि त्यांच्याजवळ एसटी साठी सॅनिटाईझर बस बनवण्याची इच्छा व्यक्त केली . त्यांनी सुद्धा होकार दर्शवुन मला पुढील प्रक्रिया सांगितली . गाडी ठाण्यात बनवायची असल्याने ठाण्यातील अधिकाऱ्यांशी  संपर्क साधून त्यांना आमची कल्पना सांगितली आणि त्यांनी सुद्धा होकार दर्शवला. 
दिनांक १४-०४-२०,मंगळवार...
खरे तर एसटीच्या बऱ्याच आगारांनी गाड्या बनवायला घेतल्या होत्या . मात्र त्याला लागणारी सामग्री उपलब्ध नसल्याने कामात अडचण येत होती . आमच्या समोर सुद्धा तेच आव्हान होते मात्र योगायोगाने आमच्या एरिया एक दुकान मिळाले ज्यात आम्हाला लागत असणारे  सर्व सामान होते. दुकानदाराने देखील लॉक डाऊन काळात आम्हाला सहकार्य करून सर्व सामान उपलब्ध करून दिले . त्या प्रमाणे मी आणि आमच्याच शेजारी राहणारा चेतन, असे आम्ही दोघे डेपोत गेलो. सॅनिटाझशन सिस्टिम बसवायला आम्ही डेपो कडून एक दोन दरवाजांची बस उपलब्ध करून घेतली . आमच्या गरजेनुसार तिच्या सर्व सीट्स काढायला लागणार होत्या . सर्व नट बोल्ट्स गंजल्यामुळे ते काढायला आमचा एक दिवस गेला . ह्यात 
संपूर्ण डेपोने खूप सहकार्य केले
दिनांक १५-०४-२०,बुधवार...
ठाणे २ आगाराकडून बस सर्व सीट्स काढल्या आहेत  ह्याची खातरजमा करून मी आणि माझा मित्र आगारात पोचलो . आम्ही येण्याअगोदरच बस वॉशिंग करून रॅम्प वर चढवली होती . आम्ही पोहोचल्यावर आमच्या सोबत मदत करायला काही यांत्रिक कर्मचारी दिले . ठाणे २ आगारातील कर्मचारी वर्ग आधीपासून ओळखीचा असल्याने काम पटापट होत होती . मोटर आणि लिकेज च्या थोड्या अडचणी आल्या परंतु त्यादेखील लगेच दूर झाल्या . बरोबर ३ तासात आम्ही एसटीची पहिली  सॅनिटाईझर बस तयार केली. पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आल्याने आम्हा सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नाही . लगेच पाणी टाकून आम्ही गाडीची मॉक टेस्ट  घेतली . आणि लगेच सर्व अधिकाऱ्यांना यशस्वी प्रयोगाचा विडिओ काढून पाठवला. अधिकाऱ्यांनी देखील आमचे अभिनंदन केले. व आज म्हणजेच १६ तारखेला बसचे  उदघाटन करायचे ठरवले . उदघाटन करण्याआधी आगारातील पेंटर श्री. पिलाने दादांनी गाडीवर सुवाच्च अक्षरात "सॅनिटाईझर बस" असे लिहिले . 
दिनांक १६-०४-२०२०, गुरुवार...
आज ठाणे विभागातील अधिकाऱ्यांनी ह्या गाडीचे ठाणे २ आगारात उदघाटन करून तिची सॅनिटायझर टाकून चाचणी  घेतली . त्यांनी सुद्धा आमचे कौतुक केले.आम्हाला सुद्धा अभिमान होता कि एवढ्या कमी वेळात गाडी बनवता आली . 
श्री.राहुल तोरो (महाव्यस्थापक) ह्यांचे विशेष आभार त्यांच्यामुळेच आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली . सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य केले कोरोना सारख्या भयानक रोगाविरुद्ध लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमच्या कडून ही छोटीशी कृती करता आली याबद्दल खूप आनंद होत आहे - संकलन सिद्धेश काणेकर व सहकारी

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन