Posts

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

Image
परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात! ​ 📌 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (असोला) येथील धक्कादायक प्रकार; ८०० आणि ५०० रुपयांची लाच घेताना झाली अटक! ​ परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):-  मोटरसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी गेलेल्या एका मजुराकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), असोला येथील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज (दि. ३ जुलै २०२६) अत्यंत यशस्वी सापळा रचून कनिष्ठ लिपिक मीरा नारायणराव लोकरे आणि लिपिक सय्यद जफर सय्यद अकबर या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे परभणी महसूल आणि आरटीओ वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ​तक्रारदार (वय २८ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. धार रोड, परभणी) यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये एक मोटरसायकल खरेदी केली होती. सदर मोटरसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्यांनी आवश्यक ती ऑनलाईन फी देखील भरली होती. दि. ३० जून २०२६ रोजी जेव्हा तक्रारदार आर.टी.ओ. कार्यालय, असोला येथे गेले, तेव्हा कनिष्ठ ...

परभणीत 'सनातन उत्थान'चा जयघोष! रोकडा हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण; बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन

Image
परभणीत 'सनातन उत्थान'चा जयघोष! रोकडा हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण; बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन ​ परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):  परभणी येथील प्रसिद्ध श्री रोकडा हनुमान मंदिर येथे काल, दिनांक ०१ जुलै रोजी सायंकाळी ठीक ८:१५ वाजता 'परभणी बागेश्वर धाम शिष्य मंडळा'च्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. 'सनातन उत्थानाचा संकल्प आणि दिव्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. ​ बागेश्वर धाम सरकारचे ऑनलाईन मार्गदर्शन आणि शुभेच्छा ​या पठण सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हनुमान चालीसा पठणानंतर संपूर्ण भारतभरातील बागेश्वर धाम शिष्यमंडळाशी बागेश्वर धाम पिठाधीश्वर, पूज्य गुरुदेव पंडित श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज यांनी ऑनलाईन माध्यमातून थेट संवाद साधल . या ऑनलाईन संवादादरम्यान गुरुदेवांनी सर्व भाविकांना आणि शिष्यांना 'सनातन उत्थान' आणि धर्म रक्षणासाठी प्रेरित करत विशेष मार्गदर्शन केले, तसेच परभणीसह देशभरातील शिष्यांना त्यांच्या पुढील धार्मिक व सामाजिक कार्यास मन...

खाद्यपदार्थ विक्रेते नियमांची उडवत आहेत सर्रास खिल्ली; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची केवळ 'वरवरची' तपासणी आणि नोटिसांचा फार्स!

Image
खाद्यपदार्थ विक्रेते नियमांची उडवत आहेत सर्रास खिल्ली; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची केवळ 'वरवरची' तपासणी आणि नोटिसांचा फार्स! नियमानुसार खाद्यपदार्थ विक्रेते का नाही करत व्यवसाय , नागरिकांनी देखील जागरूक राहून विचारायला हवा जाब ​ परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):-  परभणी शहर आणि जिल्ह्यात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स (Food Stalls), चायनीज गाड्या, पावभाजी सेंटर्स आणि व्हेज-नॉनव्हेज हॉटेल्सची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. उघड्यावर मिळणारे अन्न, स्वयंपाकघरातील दुर्गंधी, आणि नियमांना केराची टोपली दाखवून चालणारा हा व्यवसाय नागरिकांच्या जीवावर उठला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांकडून केवळ नावाला 'वरवरची' पाहणी केली जात असून, ठोस कारवाईऐवजी फक्त सूचना देण्यापुरतेच काम मर्यादित राहिले आहे. ​ नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न! ​परभणी शहरातील मुख्य चौक, रेल्वे स्टेशन परिसर आणि बाजारपेठांमध्ये चायनीज आणि पावभाजीच्या गाड्यांवर संध्याकाळच्या वेळी मोठी गर्दी होते. परंतु, या ठिकाणी वापर...

लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात! पत्रकारांना धमकावणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा; परभणीत तीव्र संताप

Image
लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात! पत्रकारांना धमकावणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा; परभणीत तीव्र संताप ​ पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांना निवेदन; पत्रकार संघटना आक्रमक, राज्यभरातून उमटतायत तीव्र पडसाद ​ परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):-  लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर लोकप्रतिनिधींकडूनच गदा आणण्याचे धक्कादायक प्रकार वाढीस लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली, तसेच असभ्य भाषेत धमक्या दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या कृत्यामुळे लोकशाहीला काळीमा फासला गेला असून, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी परभणीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर निवेदन पाठवून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. ​ लोकप्रतिनिधींचे वर्तन लोकशाहीला काळीमा फासणारे! ​दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले आणि धमक्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर थेट जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ...

अनेक तासापासून लाईट बंद ठेवली जात आहे विचारायचे कोणाला

Image
तक्रार करायची कुठे? पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास महावितरणने संपर्क क्रमांक जाहीर करण्याची नागरिकांची मागणी ​ परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी ) :-  आता सध्या परभणीतील अनेक प्रभागात थोडे जरी वारे आले आणि पाऊसाचे पाणी सुरू झाले की थेट विद्युत पुरवठा खंडित होतो हे नेहमीचेच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने परभणीतील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. वीज खंडित झाल्यानंतर नेमकी तक्रार कुठे करावी किंवा माहिती कोणाकडून घ्यावी, हे नागरिकांना समजत नाही. अनेकदा महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन लागत नसल्याने नागरिकांचा रोष वाढतो. या पार्श्वभूमीवर, महावितरणने त्यांचे फ्युज कॉल सेंटरचे नंबर आणि इतर जबाबदार कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तातडीने सार्वजनिक करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ​अधिकाऱ्यांकडून वेळेवर माहिती न मिळाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. वीज गुल झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि महिलांचे अतोनात हाल होतात. विशेषतः पाणीपुरवठ्...

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त

Image
सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त आणि नष्ट; नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक बडगा ​ परभणी / सेलू: (टिळक रत्न प्रतिनिधी)- अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा देत परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सेलू येथील एका बेकरीवर छापा टाकून अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात आलेला तब्बल १५,६०० रुपये किमतीचा ७८ किलो ब्रेड केकचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. ​📍 'श्री बालाजी राजस्थान बेकर्स'वर छापा ​मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २२ जून २०२६ रोजी सेलू येथील गणपती गल्लीत असलेल्या 'मॅ. श्री बालाजी राजस्थान बेकर्स' याPrem Ram Choudhary (वय २१ वर्षे) याच्या मालकीच्या पेढीवर अचानक छापा टाकला. ​🤢 अस्वच्छता आणि वृत्तपत्राचा वापर; आरोग्याशी थेट खेळ! ​कारव...

परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'कागदी' कारवाईचा धडाका? कारवाई केवळ नावापुरतीच; मावा-गुटक्याची खुलेआम विक्री सुरूच!

Image
परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'कागदी' कारवाईचा धडाका?  कारवाई केवळ कागदावरच नावापुरतीच; मावा-गुटक्याची खुलेआम विक्री सुरूच! ​ परभणी /टिळक रत्न प्रतिनिधी:  अन्न व औषधी प्रशासनाच्या राज्य आयुक्तपदी श्री तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार केलेल्या कारवाया पाहून अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील पानपट्ट्या बंद झाल्याचे चित्र उभे केले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीवर उतरून कोणतीही ठोस कारवाई केल्याचे अद्यापपर्यंत तरी दिसून आलेले नाही. प्रशासनाचा हा तथाकथित धडाका केवळ कागदावरच मर्यादित आहे की काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. ​ सुगंधित मावा आणि गुटक्याची खुलेआम विक्री ​वास्तविक पाहता, आजही परभणी शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांत परिस्थिती 'जैसे थे' आहे. कच्च्या सुपारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित पदार्थ आणि आरोग्याला घातक असणारे तंबाखूजन्य पदार्थ मिक्स करून 'मावा' आणि 'गुटका' खुलेआम त...

परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त!

Image
परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा केवळ 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त! आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतरही परभणीत संथ कारवाया; सहाय्यक आयुक्त चौधरी यांनी गांभीर्याने मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी कारवाई केल्याचे मिडीयाला सांगू नका असे देखील मिळाली माहिती सोमवारी अन्न व औषधी प्रशासनातील अधिकारी तपासणी करण्यास येणार आहेत अशा एका अफेनेच परभणीतील खिचडी सेंटर बंद ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले , यातून एक चर्चा देखील समोर आली की ह्यांना कसं काय कळाले की तपासणी होणार आहे परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांभाळल्यापासून विभागाला शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांच्या पदभार स्वीकारानंतर परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत आत्तापर्यंत १६ ठिकाणी कारवाया करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, या कारवाया केवळ ‘आम्ही काहीतरी करतोय’ हे दाखवण्यापुरत्याच म्हणजेच केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचा सूर परभणीकरांमधून उमटत आहे. जिल्ह्यात अन्नप...

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा

Image
मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना मुंबई, दि. १२ (टिळक रत्न प्रतिनिधी) : राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे, सुनील हनवट आदी उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, गठित समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर ...

नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा

Image
परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण १ ते १५ मे या कालावधीत स्वगणना मोहिम स्वगणनेसाठी लिंक se.census.gov.inही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय आहे परभणी, दि. १६  (टिळक रत्न प्रतिनिधी) -- भारत सरकारकडून देशाची १६ व्या जनगणनेच्या कामास सुरुवात झालेली असुन या जनगणनेमध्ये यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणने‌द्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. स्व-गणनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी  दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना मोहिमेबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली.     *स्व-गणना म्हणजे काय ? -* आपण स्वतः आपल्या मोबा...

अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज

Image
अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज   वस्तु, कपडे, खाद्यपदार्थ, ज्वेलरी, कलात्मक वस्तु खरेदीची संधी परभणी, दि. 17 (टिळक रत्न प्रतीनिधी ) :  ‘ अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 28 व 29 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक, लघुउद्योजक व विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती साहित्य, कलात्मक वस्तू, ज्वेलरी आदी उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने एकाच ठिकाणी म...

महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड

Image
महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड  परभणी,दि.16(टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवाजी शेषराव भरोसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.          राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेशराव वरपुडकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.          दरम्यान, परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी शेषराव भरोसे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला. यावेळी गटनेत्या तिरुमला खिल्लारे, मोकींद खिल्लारे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.         दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत परभणी शहराच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले.

उद्या पासून 3 दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज

Image
 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे* मुंबई, दि. 16 मार्च (टिळक रत्न प्रतिनिधि) : दि. 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 17 मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. 21 मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होण्याचे संकेत आहेत. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्या...

प्रशासकीय इमारत परिसरात आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार; वाहनांच्या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडथळा

Image
 परभणी  प्रशासकीय इमारत परिसरात आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार; वाहनांच्या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडथळा परभणी | टिळक रत्न प्रतिनिधी :-  परभणी शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात मागील वर्षापर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यरत होते. सध्या आरटीओ कार्यालय असोला येथे स्थलांतरित करण्यात आले असले तरी, आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार मात्र अद्याप प्रशासकीय इमारत परिसरात सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. आरटीओ कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतरही पासिंगसाठी येणारी वाहने एजंटांकडून प्रशासकीय इमारतीच्या मैदानात आणि परिसरातच उभी करण्यात येत आहेत. याठिकाणी एजंटांकडून वाहनांची कागदपत्रे तपासणी व इतर कामेही सुरू असल्याचे दिसून येते. परिणामी, परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग होत असून संपूर्ण रस्ता अडवला जात आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये विविध शासकीय कार्यालये कार्यरत असल्याने दररोज अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र एजंटांनी उभ्या केलेल्या वाहनांमुळे अधिकाऱ्यांच्या वाहनांना आत जाण्यासाठी पुरेशी जागाच राहत नसल्याची तक्रार समोर आली आहे. अन...

रमजान काळातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष; अन्न व औषधी विभागाच्या नोटिसांनंतरही विक्रेत्यांची ‘जैसे थे’ स्थिती

Image
 रमजान काळातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष; अन्न व औषधी विभागाच्या नोटिसांनंतरही विक्रेत्यांची ‘जैसे थे’ स्थिती परभणी, दि. ९ (टिळक रत्न प्रतिनिधी): पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असताना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने साप्ताहिक टिळक रत्न यांच्या मागणीनुसार काही दिवसांपूर्वी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटीस बजावून स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या कारवाईनंतरही अनेक विक्रेत्यांच्या कामकाजात कोणताही ठोस बदल झालेला दिसून आलेला नाही. शहरातील विविध भागातील हॉटेल, नाश्ता केंद्रे व रमजान निमित्त उभारण्यात आलेल्या खाद्य स्टॉलची पाहणी केली असता, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे, स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष, हातमोजे व हेडकॅपचा अभाव तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आली. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या बाबीकडे संबंधित विक्रेते गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट झाले. अन्न व औषधी विभागाने नोटीस देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्...

महापौर सय्यद इकबाल यांचा आशा वर्करांशी संवाद;

Image
महापौर सय्यद इकबाल यांचा आशा वर्करांशी संवाद;  महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा परभणी, दि. 9 (टिळक रत्न प्रतिनिधी)- : परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर सय्यद इकबाल यांनी महानगरपालिका अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांची सोमवारी (दि. 9) बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आशा वर्कर महिलांना शुभेच्छा दिल्या. या बैठकीस शिवसेना जिल्हा महिला संघटक प्रमुख सौ. अंबिकाताई डहाळे, सौ. वंदना कदम आदी महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या. आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करांनी गरोदर मातांची नियमित तपासणी, औषध व लसीकरणाबाबत जनजागृती करावी तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत उपलब्ध सुविधा घराघरांत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, घरात कचराकुंडी ठेवावी आणि घंटागाडी आल्यावर कचरा त्यात टाकावा याबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी सौ. अंबिकाताई डहाळे यांनीही आशा वर्कर महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न...

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

Image
 “गोशाळा प्रकरणात कारवाईसाठी 10 हजारांची मागणी; 8 हजार घेताना पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याला एसिबी ने केले जेरबंद” लाच घेताना पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली अगदी फिल्मी स्टाईल सारखी घटना   परभणी, दि. 7 (टिळक रत्न प्रतिनिधी) : तक्रारीवर कारवाई करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धडक कारवाई गंगाखेड येथे करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे ओमकार नगर, गंगाखेड येथील 70 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, ते गोशाळा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने सोनपेठ पोलीस ठाण्यात गोशाळेतून गाय व दोन वासरे जबरदस्तीने नेल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर कारवाई करण्यासाठी बीट जमादार व पोलीस हवालदार भगवान विठ्ठल मुंढे (वय 54) यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. लाच मागणीची पडताळणी दि. 25 फेब्रुवारी रोजी गंगाखेड-परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्...

परभणी : रमजानमध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष? अन्न व औषधी विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

Image
परभणी : रमजानमध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष? अन्न व औषधी विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी):- परभणी शहरात पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांकडून दिवसभर रोजे (उपवास) ठेवले जात आहेत. सायंकाळी इफ्तारच्या वेळी विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होताना दिसत आहे. शहरातील विविध भागात तात्पुरत्या स्टॉलवर समोसे, भजी, पकोडे, चिकन पदार्थ तसेच इतर तळलेले मांसाहारी व शाकाहारी पदार्थ खुलेआम विकले जात आहेत. मात्र या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तळणासाठी वापरले जाणारे तेल योग्य दर्जाचे आहे का? ते वारंवार वापरले जात आहे का? मांसाहारी पदार्थांची कोणत्याही प्रकारे तपासणी झाली आहे का? याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी उघड्यावर अन्न ठेवलेले दिसते, विक्रेते हातात हातमोजे तसेच डोक्यावर टोपी तोंडावर मास्क याचा वापर करताना दिसून येत नाहीत तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी किंवा कारवाई झाल्याचे कुठेही ...

महत्त्वाची सूचना - युद्ध परिस्थती भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Image
महत्त्वाची सूचना -  युद्ध परिस्थती भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा  (टिळक रत्न प्रतिनिधी) - मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारती...

परभणीत पदोन्नतीसाठी १२ हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायक ए. सी. बी. च्या जाळ्यात अडकले

Image
परभणीत पदोन्नतीसाठी १२ हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायक ए. सी. बी. च्या जाळ्यात अडकले  लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांनी यशस्वी सकाराचं तिघांविरुद्ध केली धडक कारवाई परभणी दि. 23 फेब्रु (टिळक रत्न प्रतिनिधी) - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी यांनी यशस्वी सापळा रचत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील तिघांविरुद्ध कारवाई केली. पलटण नायक पदाच्या पदोन्नतीसाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ८ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारल्यानंतर उर्वरित रकमेवर तडजोड करून १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल रायबा, जिंतूर रोड येथे सापळा रचण्यात आला. यावेळी वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांनी पंचासमक्ष १२ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणात केंद्रनायक नानासाहेब मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक वाडेकर आणि वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे नानलपेठ येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्य...