महत्त्वाची सूचना - युद्ध परिस्थती भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महत्त्वाची सूचना - युद्ध परिस्थती भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा 


(टिळक रत्न प्रतिनिधी) - मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.

या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.


आपत्कालीन संपर्क तपशील


रामल्लाह  (पॅलेस्टाईन)

फोन : +970592916418

ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in


दोहा (कतार)

फोन : 00974-55647502

ईमेल : cons.doha@mea.gov.in


रियाध (सौदी अरेबिया)

फोन : 00-966-11-4884697

WhatsApp : 00-966-542126748

टोल फ्री : 800 247 1234

ईमेल : cw.riyadh@mea.gov.in


तेल अवीव (इस्रायल)

फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in


तेहरान (इराण)

फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359


अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री : 800-46342

WhatsApp : +971543090571

ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in


कुवैत 

फोन : +96565501946

ईमेल : community.kuwait@mea.gov.in


बाहरीन

फोन : 00973-39418071


मस्कत

टोल फ्री : 80071234

WhatsApp : +96898282270

ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in


जॉर्डन

फोन : 00962-770 422 276


बगदाद (इराक) 

फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899 

वेबसाइट :eoibaghdad.gov.in

ईमेल : cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

https://x.com/i/status/2027746402575782262

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज