परभणीत पदोन्नतीसाठी १२ हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायक ए. सी. बी. च्या जाळ्यात अडकले
परभणीत पदोन्नतीसाठी १२ हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायक ए. सी. बी. च्या जाळ्यात अडकले
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांनी यशस्वी सकाराचं तिघांविरुद्ध केली धडक कारवाई
परभणी दि. 23 फेब्रु (टिळक रत्न प्रतिनिधी) - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी यांनी यशस्वी सापळा रचत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील तिघांविरुद्ध कारवाई केली. पलटण नायक पदाच्या पदोन्नतीसाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ८ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारल्यानंतर उर्वरित रकमेवर तडजोड करून १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल रायबा, जिंतूर रोड येथे सापळा रचण्यात आला. यावेळी वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांनी पंचासमक्ष १२ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.
या प्रकरणात केंद्रनायक नानासाहेब मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक वाडेकर आणि वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे नानलपेठ येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली तर पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Comments
Post a Comment