परभणी शहर महानगर पालिका नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर ह्यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी साप्ताहिक संपादक संघटनेतर्फे सत्कार
परभणी शहर महानगर पालिका नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर ह्यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी साप्ताहिक संपादक संघटनेतर्फे सत्कार परभणी दि.17 फेब्रुवारी(टिळक रत्न प्रतिनिधी ): परभणी शहर महानगर पालिका नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर मराठी साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात विविध साप्ताहिकांचे संपादक व डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचे वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महापौर उपमहापौर यांना शाल पुष्पहार व भारताच्या संविधानाची उद्देशिका प्रतिमा देऊन सत्कार केला. पत्रकारिता हा लोकशाहीचा पाया असून, वृत्तपत्रे नागरिकांना योग्य व निष्पक्ष माहिती आणि उपक्रम पोहोचवितात,” असेच सर्व उपक्रम योजना परभणी शहर महानगर पालिका वतीने राबविल्या जातील हे आपल्या साप्ताहिक वृत्तपत्र द्वारे नागरिकां पर्यंत पोहचवण्यात आम्हाला सहकार्य करावे आणि आपल्या परभणी शहराच्या विकास करिता जे जे आवश्यक आहे ते ते मी महापौर म्हणून करण्याचा प्रयत्न करणार नागरिकांनी देखील मनपाला सहकार्य करावे आपली परभणी स्वच्छ सुंदर करुयात असे परभणी मनपा महापौर श्...