पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी, दि. १७ (टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज पार पडलेल्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या या मेळाव्यात सुमारे 500 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी  ९८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील बारावी, आयटीआय, डीप्लोमा, पदवी , बी.ई, इत्यादी शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांसाठी फिल्ड ऑफीसर, ट्रेनी ऑपरेटर, क्षेत्र अधिकारी, सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह, फिल्ड ऑफिसर, ट्रेनी केंद्र मॅनेजर, विमा सल्लागार, विमा सखी ऑपरेटर इत्यादी पदांसाठी  मुलाखत घेण्यात आली.

मेळावा यशस्वीतेसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्रशांत खंदारे, संस्थेचे प्राचार्य भातलवंडे, उपप्राचार्य काळे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म. श. शिंदे तसेच उद्योजकता केंद्रातील प्रविण रुद्रकंठवार, राहूल गजभारे, अंकुश कदम, सुमित दिक्षीत, सचिन चव्हाण, राहूल काळे, करिमोद्दीन अन्सारी आणि संस्थेचे अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*-*-*-*-*-*

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त