परभणी मनपा आरोग्य केंद्र आहे की भंगारखाना, येथे रुग्ण बरा होण्यास ऐवजी आणखी आजारी पडेल काय चालले आहे

 परभणी मनपा आरोग्य केंद्र आहे की भंगारखाना, येथे रुग्ण बरा होण्यास ऐवजी आणखी आजारी पडेल काय चालले आहे - मनपा महापौर सय्यद इकबाल

आरोग्य केंद्रांची दुरवस्था; महापौर संतप्त, अधिकाऱ्यांना दम

 परभणी, (टिळक रत्न प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीतील कल्याण मंडपम, खानापूर आदी भागातील आरोग्य केंद्रांची अत्यंत बकाल अवस्था पाहून महापौर सय्यद इकबाल संतप्त झाले. शनिवारी त्यांनी ज्येष्ठ सदस्य दिलीप ठाकूर यांच्यासह विविध केंद्रांना भेट देत स्वच्छता, ओपीडी, औषध विभाग व इमारतीतील सुविधांची पाहणी केली.

     केंद्रांमध्ये साचलेली धूळ, भिंतींवरील जाळी, कचऱ्याचे ढीग तसेच अस्वच्छ परिसर पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “हे आरोग्य केंद्र नव्हे, भंगारखाना आहे; येथे रुग्ण बरा होण्याऐवजी अधिक आजारी पडेल,” अशी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत व संबंधित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

    सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, केंद्रातील गलिच्छपणा त्वरित दूर करावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर सय्यद इकबाल यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त