परभणी जिल्ह्यात उद्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा; 26,668 विद्यार्थी बसणार

परभणी जिल्ह्यात उद्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा; 26,668 विद्यार्थी बसणार


परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी): जिल्ह्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन उद्या, दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा केंद्रानिहाय घेण्यात येणार असून जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद परभणी श्री. बालाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवी व आठवी या दोन्ही वर्गांसाठी स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

इयत्ता पाचवी

केंद्र संख्या : 98

परीक्षार्थी : 16,541

सहभागी शाळा : 1,212

इयत्ता आठवी

केंद्र संख्या : 51

परीक्षार्थी : 10,127

सहभागी शाळा : 573

दोन्ही वर्ग मिळून एकूण 26,668 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून जिल्हाभरात एकूण 149 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षेचे स्वरूप दोन पेपरांचे असून प्रत्येक पेपराचा कालावधी दीड तासाचा आहे.

पेपर क्रमांक 1 : सकाळी 11.00 ते दुपारी 12.30

पेपर क्रमांक 2 : दुपारी 2.00 ते 3.30

परीक्षा सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक त्या सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व संबंधित कर्मचारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेकडो शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेस बसत असल्याने शिक्षण क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारी महत्त्वाची संधी मानली जाते.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पालक व विद्यार्थ्यांना परीक्षा शिस्तबद्ध आणि नियमांचे पालन करून देण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज