परभणी जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्साहात संपन्न

परभणी जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षा 2026 उत्साहात संपन्न 

परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी)- येथे इयत्ता पाचवी व ईयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथूर यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील पोलास आणि डॉ. सविता बिर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.

इयत्ता पाचवी

परभणी जिल्ह्यात इयत्ता पाचवीसाठी एकूण 98 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी : 16,557

सकाळ सत्र उपस्थित : 15,573

दुपार सत्र उपस्थित : 15,571

विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग नोंदविला.

इयत्ता आठवी

इयत्ता आठवीसाठी जिल्ह्यात 51 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती.

परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी : 10,133

सकाळ सत्र उपस्थित : 9,491

दुपार सत्र उपस्थित : 9,491

दोन्ही सत्रांमध्ये उपस्थिती जवळपास समान राहिली असून विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.

नियोजनबद्ध व्यवस्था

परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक व प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या समन्वयामुळे परभणी जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त