परभणी शहर महानगर पालिका नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर ह्यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी साप्ताहिक संपादक संघटनेतर्फे सत्कार
परभणी शहर महानगर पालिका नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर ह्यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी साप्ताहिक संपादक संघटनेतर्फे सत्कार
परभणी दि.17 फेब्रुवारी(टिळक रत्न प्रतिनिधी ): परभणी शहर महानगर पालिका नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर मराठी साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात विविध साप्ताहिकांचे संपादक व डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचे वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महापौर उपमहापौर यांना शाल पुष्पहार व भारताच्या संविधानाची उद्देशिका प्रतिमा देऊन सत्कार केला. पत्रकारिता हा लोकशाहीचा पाया असून, वृत्तपत्रे नागरिकांना योग्य व निष्पक्ष माहिती आणि उपक्रम पोहोचवितात,” असेच सर्व उपक्रम योजना परभणी शहर महानगर पालिका वतीने राबविल्या जातील हे आपल्या साप्ताहिक वृत्तपत्र द्वारे नागरिकां पर्यंत पोहचवण्यात आम्हाला सहकार्य करावे आणि आपल्या परभणी शहराच्या विकास करिता जे जे आवश्यक आहे ते ते मी महापौर म्हणून करण्याचा प्रयत्न करणार नागरिकांनी देखील मनपाला सहकार्य करावे आपली परभणी स्वच्छ सुंदर करुयात असे परभणी मनपा महापौर श्री सय्यद एकबाल ह्यांनी सत्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त केले .
यावेळी मराठी साप्ताहिक वृत्तपत्र संपादक संघटनेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक टिळक रत्न संपादक मंदार कुलकर्णी, उपाध्यक्ष साप्ताहिक लोक व्यथा संपादक पांडुरंग अंभोरे, सचिव साप्ताहिक ई लोकमेल संपादक सुहास पंडित, वैभवज्वाला संपादक देवानंद वाकळे, हर्ष नगरीचे संपादक संघपाल आढागळे, यशचे संपादक मयूर देशमुख, विठोबाचे संपादक प्रवीण मोरे, अर्णव नगरीचे संपादक बालाजी काळे, लोकभारतीचे संपादक रवींद्र देशमुख आणि डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी परस्पर संवाद साधत परभणी शहर स्वच्छ व सुंदर ह्या विषयावर चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Comments
Post a Comment