Posts

परभणीच्या नागरिकानो पुढील मार्गाने जाऊ नका पुलावरून पाणी वाहत आहे

Image
परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्न दुधना व यलदारी धरण तसेच ढलेगाव दिग्रस मुदगल तरुगव्हान बंधारे तसेच झरी करपरा मासो व मुळी हे मध्यम प्रकल्प व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करणे चालू आहे त्यामुळे नागरिकांनी सद्य परिस्थितीत पुढील मार्गाने पुलावरून जाणे टाळावे ताडकल्स ते पूर्णा मार्गावरील धानोरा काळे पूल गंगाखेड अहमदपूर मार्गावरील इसाद पूल व राणीसावरगाव पूल सोनपेठ शिरसाला मारगावरील उखळी व उक्कडगाव पूल सेलू वालुर मार्गाने मोरगाव पूल परभणी ताडकळस मार्गाने पिंगळी पूल गंगाखेड पालम मार्गावरील मरडसगाव पूल  सदरील कमी उंची चे पूल आहेत ह्यावरून पाणी वाहत असल्याने धोक्याचा इशारा देण्यात आला आहे कोणीही ह्या पुलावरून सद्य परिस्थिती मध्ये प्रवास करणे टाळावे करिता सूचित केले गेले आहे 

चोराने परभणीत खाजगी दवाखान्याच्या आय सी यु वॉर्ड मधुन रुग्णाचे तब्बल पाऊण लाखाचा ऐवजवर डल्ला

Image
आता चोरांनी दवाखाने सुद्धा सोडले नाहींत.....परभणीकरानो सावध रहा..!! परभणी (वार्ता) : आधीच परभणीत वाहन चोर मोबाईल चोर पाकिटमार भुरटे चोर बसस्थानक रेल्वे स्टेशन गर्दीचे ठिकाण वरून आपले हातसाफ करत आहेतच पण आता चोरांनी दवाखाने देखील सोडले नसल्याचे घटना समोर आली आहे  घटना अशी की अशोक अँभुरे ह्यांचे आईचे वय (55) उपचार करिता आपल्या गावावरून परभणीत बस स्टॅण्ड रोड भागातील परतानी दवाखाण्यात आय सी यु मध्ये दाखल झाले आज दि 6 सप्टेंबर 2021  पहाटेच्या  सुमारास  त्यांचे जवळील बॅग मध्ये पर्स च्या आत ठेवलेले कानातील डोरले गळ्यातील पोत व रोख रक्कम अंदाजे 55000 रुपये सकाळी बॅग मध्ये नसल्याचे दिसून आले  शोधाशोध केले असता रिकामी पर्स आय सी यु च्या वॉशरूम मध्ये आढळून आली सदरील घटनेची फिर्याद अशोक अँभुरे ह्यांनी नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे पुढील तपास चालू आहे  पोलिसांनी परतानी हॉस्पिटलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फूटेज व पर्स ताब्यात घेतले आहे लवकरच त्या चोरटे ताब्यात येण्याची शक्यता आहे  ते चोरटे कोण आहेत ह्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार संजय (बंडू) जाधव मेडिकल कॉलेज येत नाही तो पर्यंत करणार प्राणांतिक उपोषण

Image
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे ह्या करिता 7 सप्टेंबर पासून खासदार जाधव करणार प्राणांतिक उपोषण लढाई आता निकराच्या व हातघाईच्या टप्प्यावर आली आहे.असे सांगत खासदार संजय जाधव यांनी उपोषणाची घोषणा केली. परभणी ः `देह जावो अथवा राहो, पांडूरंगी दृढ भावो`, या अभंगातून शिवसेना खासदार संजय जाधव यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी  निकराची लढाई सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत. सात सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.  शुक्रवारी या आंदोलनात संत, महंत, वारकरी सांप्रदाय, लोककलावंत व खेळाडूंनी मोठ्या संख्येनेसहभागी होऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला.   शुक्रवारी (ता.तीन) या आंदोलनात जिल्ह्यातील संत, महंत, विविध वारकरी संस्थांचे वारकरी, लोककलावंत, खेळाडू, क्रीडा संघटक उतरले होते सायंकाळी आंदोलनस्थळी खासदार संजय जाधव ह्यांनी म्हंटले

सारथीच्या प्रगती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पत्र

Image
मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ▪️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदार संभाजीराजे  छत्रपती यांना पत्र      मुंबई दि १९ ऑगस्ट (प्रतिनिधी):-  मराठा समाजाच्या समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. याविषयीची संपूर्ण माहिती देणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिले आहे.  आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली असून, अद्याप ती न्यायप्रविष्ट आहे. त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असेही या पत्रात म्हटले आहे. *राष्ट्रपती, पंतप्रधानांना विनंती* राज्य विधानमंडळाने देखील आरक्षणाची 50%इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता घटनेत योग्य ती सुधारणा करावी अशी शिफारस केंद्र सरकारला ठरावाद्वारे केली आहे. राष्ट्रपती...

कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Image
 कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव नांदेड (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे यांचा पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील दोन वर्षापासून कोविड-१९ काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल रविवार दि.१५ आँगष्ट रोजी स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डाँ.विपीन ईटनकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त डाँ.सुनिल लहाणे,अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदीं उपस्थित होते.

परभणीचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल ह्यांनी काढले कर्मचारी बदलीचे आदेश

Image
 एकाच जागी सहावर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ▪️जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काढले आदेश  परभणी, दि. 9 – ज्या कर्मचाऱ्यांच्या एकाच ठिकाणी सहावर्षापेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केल्या. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समुपदेशन करुन पात्र कर्मचारी यांच्या बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात आदेश दिले. आपल्याला उपलब्धतेनुसार कर्मचाऱ्यांना मनाजोगे ठिकाण मिळालेले आहे. नवीन ठिकाणी बदली झालेले कर्मचारी यापुढेही चांगली सेवा बाजावतील असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला. बदली झाल्यामध्ये सहा वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेले मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, लिपिक यांचा समावेश आहे. कर्मचारी उपलब्धतेनुसार ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणीकर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी निवड मंडळाचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, सदस्य तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सदस्य तथा उपजिल्हाधिका...

महाराष्ट्र राज्य एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर : नेहमी प्रमाणे मुलींनी बाजी मारली

Image
दहावीचा निकाल 99.95 टक्के, नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी, 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण दहावीच्या परिक्षेत कोकणाची बाजी; राज्यात सर्वाधिक १०० टक्के निकाल  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत राज्यातल्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे, तो म्हणजे ९९.८४ टक्के. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यापैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे.राज्यातल्या इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे (निकालाची टक्केवारी)- पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अ...