Posts

Showing posts from August, 2025

कृषि विद्यापीठातीलकम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमातून करीअरच्या उत्तम संधी

Image
कृषि विद्यापीठातीलकम्युनिटी सायन्स अभ्यासक्रमातून करीअरच्या उत्तम संधी - डॉ.जया बंगाळे भारतामधील विविध राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये कम्युनिटी सायन्स (सामुदायिक विज्ञान) अभ्यासक्रम राबवला जात असून. महाराष्ट्र राज्यातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कम्युनिटी सायन्स हा राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहे.  वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाप्रमाणेच कृषि विषयांतर्गत असणारा सामुदायिक विज्ञान हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागतो. इयत्ता 12 वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एसस्सी (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्राप्त होते.  प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता : विद्यार्थ्याने इयत्ता 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा याबरोबरच सक्षम विभागाकडून आयोजित करण्यात आलेली एमएचटी सीईटी/जेईई/नीट सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे. या अभ्यासक्रमासाठी मुला-मुलींना प्रवेश खुला असून शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना...

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

Image
परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर परभणी, दि. 22 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) :  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 9 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक- 2025-26 करीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना आज दि. 22 ऑगस्ट 2025  रोजी परिशिष्ट 8 (अ) व 8(ब) मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जील्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, परभणी कार्यालय,  संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय,  संबंधित तहसील कार्यालय आणि संबंधित पंचायत समितींच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://parbhani.gov.in वर उपलब्ध असेल, सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केले आहे. *-*-*-*-*

परभणीचे जिल्हाधिकारी गावडे यांची मुंबईस तडकाफडकी बदली नूतन जिल्हाधिकारी पदी संजय चव्हाण यांची नियुक्ती

Image
परभणीचे जिल्हाधिकारी गावडे यांची मुंबईस तडकाफडकी बदली नूतन जिल्हाधिकारी पदी संजय चव्हाण यांची नियुक्ती परभणी  ता.20 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) : मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजयसिंग  चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.येथील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज मुंबईस तडकाफडकी बदली केली.श्री.गावडे यांना बुधवारी सकाळी या बदली संदर्भातील आदेश प्राप्त झाला. गावडे यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे ठिकाण कळाले नाही.चव्हाण यांच्या  बदली संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संजय उमराणीकर यांनी या आदेश काढला.दरम्यान नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे एमपीएसीमधून 1993 साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ते मुळचे भोळी ( ता.खंडाळा, जि.सातारा) येथील आहेत. कायद्याचे पदवीधर असलेल्या श्री.चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज (1998÷-2001), इचलकरंजी (2003-05) येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अ...

विठ्ठल कटारे यांना फौजदारपदी बढती; श्रीपेडा हनुमान मंदिरात सत्कार

Image
 विठ्ठल कटारे यांना फौजदारपदी बढती; श्रीपेडा हनुमान मंदिरात सत्कार  परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी): जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सहायक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल कटारे पोलीस उपनिरीक्षपदी बढती मिळाली आहे. याबद्दल शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात सोमवारी (दि.18) सायंकाळी मंदिराचे मुख्य पुजारी श्रीराम तिवारी यांच्या हस्ते श्री.कटारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी   ॲड.राजकुमार भांबरे, महेश सोनी, प्रा.डॉ.रामानंद व्यवहारे, सुरेंद्र पाथरीकर, प्रदीप धर्मशेट्टी, व्यंकटेश शर्मा, निलेश तिवारी, योगेश तिवारी, दत्ता पहारे, दत्ता पहारे, पवन शर्मा, ॲड.बाळप्पा धुळे, मनोज काबरा, तुळशीदास जोशी, दत्ता जैस्वाल आदी उपस्थित होते.

परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यायचे तर नवीन दर लागू

 परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सुविधांसाठी. 1 सप्टेंबरपासून ठराविक दर लागू परभणी, दि. 19 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाल्याने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक वैशिवि-२०१७/प्र.क्र.१९१/प्रशा-२, दिनांक २० नोव्हेंबर २०१७ नुसार दि. १ सप्टेंबर २०२५ पासुन  जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांसाठी  ठराविक शुल्क आकारले जाणार आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी देण्यासाठी संबंधीत महाविद्यालयाकडे रुग्णालय असणे बंधनकारक आहे. परभणी येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले. प्रशासकीय स्तरावर हे हस्तांतरण झालेले आहे. शासन निर्णयानुसार वैद्यकीय महाविद्यालयाकडे असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सुविधांसाठी शासनाने ठराविक दर लागू केले आहेत. त्यानुसार बाहयरुग्ण विभागात तपासाणीसाठी २० रुपये, एक्सरेसाठी ९० रूपये, आंतररुग्ण विभागात नोंदणीसाठी...

एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड निर्मितीसाठी 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Image
  एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री  जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड निर्मितीसाठी 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन परभणी, दि. 19 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी)- एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत को ब्रँडेड आयुष्मान कार्ड निर्माणासाठी दि. 16 ते  31 ऑगस्ट 2025 या कालावधीत परभणी जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, या मोहिमेचा लाभ घेऊन आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.  योजनांचा उद्देश/लाभः - एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील. अंगीकृत रुग्णालयांमध्ये एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना  आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार...

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, पोळा उत्साहात व शांततेत साजरा करावा-- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, पोळा उत्साहात व शांततेत साजरा करावा-- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी, दि. 19 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी ) : - गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, पोळा हे सण उत्साहात व शांततेत करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृह येथे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर,  निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदींसह विविध विभागांचे अधिकारी, विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री गावडे म्हणाले की, गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे. हा सण सर्वजण जल्लोषात व उत्साहात साजरा करतात.  गणेशोत्सव साजरा करतांना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. गणेशमंडळांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येईल. त्याचप्रमाणे पोळा, ईद-ए-मिलाद हे सणही आनं...

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

Image
 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार दि. १९ ऑगस्ट, २०२५. *मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)* • मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग) • कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन  देणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग) • सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला - कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता.  (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग) • राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)                                      ...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत अर्ज करण्यास 27 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Image
 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत अर्ज करण्यास 27 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ परभणी दि. 18 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या शासनाच्या संकेतस्थाळावर ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक निश्चित झालेले आहेत. बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युतर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशासाठी अर्ज करण्यास दि. 27 ऑगस्ट, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अर्ज छाननी करण्यात येईल. दि. 3 सप्टेंबर रोजी पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि. 12 सप्टें...

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Image
परभणी सारंग स्वामी विद्यालय  2005 दहावी वर्गाच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) -  येथील श्री सारंग स्वामी विद्यालय, परभणी येथील   2005 वर्ग 10 वी बॅचचे वर्ग मित्र मैत्रीणी स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.वीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली त्यानंतर 2005 च्या मित्र-मैत्रिणींचा वर्ग भरवण्यात आला, यावेळी स्नेह मिलन कार्यक्रम चे प्रास्ताविक मनोगत झाले आणि उपस्थित वर्ग शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि भगवद्गगीता ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. नंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केल्या. वर्गातील गमतीदार किस्से, शिक्षकांचा विशिष्ट संवाद किंवा लकब, कोणीतरी शिक्षकांपासून सुटण्यासाठी केलेले बहाण...