गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, पोळा उत्साहात व शांततेत साजरा करावा-- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, पोळा उत्साहात व शांततेत साजरा करावा-- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


परभणी, दि. 19 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी ) : - गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, पोळा हे सण उत्साहात व शांततेत करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.


आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृह येथे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर,  निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदींसह विविध विभागांचे अधिकारी, विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्री गावडे म्हणाले की, गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण आहे. हा सण सर्वजण जल्लोषात व उत्साहात साजरा करतात.  गणेशोत्सव साजरा करतांना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. गणेशमंडळांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येईल. त्याचप्रमाणे पोळा, ईद-ए-मिलाद हे सणही आनंदात व शांततेत साजरे करावेत.


पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले की, दरवर्षी आपल्या जिल्ह्यात व शहरात गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हाच पायंडा यावर्षीही पाळण्यात यावा. सण साजरा करतांना कुणाच्याही भावना दुखावणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करु नयेत. गणेशोत्सवात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोळा, ईद-ए-मिलाद हे सणही उत्साहात व शांततेत साजरे करावेत.

000000

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त