परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

परभणी, दि. 22 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) :  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 9 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक- 2025-26 करीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना आज दि. 22 ऑगस्ट 2025  रोजी परिशिष्ट 8 (अ) व 8(ब) मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जील्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, परभणी कार्यालय,  संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय,  संबंधित तहसील कार्यालय आणि संबंधित पंचायत समितींच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://parbhani.gov.in वर उपलब्ध असेल, सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केले आहे.

*-*-*-*-*

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त