परभणीचे जिल्हाधिकारी गावडे यांची मुंबईस तडकाफडकी बदली नूतन जिल्हाधिकारी पदी संजय चव्हाण यांची नियुक्ती

परभणीचे जिल्हाधिकारी गावडे यांची मुंबईस तडकाफडकी बदली नूतन जिल्हाधिकारी पदी संजय चव्हाण यांची नियुक्ती



परभणी  ता.20 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) : मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजयसिंग  चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.येथील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज मुंबईस तडकाफडकी बदली केली.श्री.गावडे यांना बुधवारी सकाळी या बदली संदर्भातील आदेश प्राप्त झाला. गावडे यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे ठिकाण कळाले नाही.चव्हाण यांच्या  बदली संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संजय उमराणीकर यांनी या आदेश काढला.दरम्यान नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे एमपीएसीमधून 1993 साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ते मुळचे भोळी ( ता.खंडाळा, जि.सातारा) येथील आहेत. कायद्याचे पदवीधर असलेल्या श्री.चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज (1998÷-2001), इचलकरंजी (2003-05) येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, शेती महामंडळ मुख्य प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच  पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालयात सामान्य प्रशासनचे उपायुक्‍त म्हणून काम केले.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त