एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड निर्मितीसाठी 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड
निर्मितीसाठी 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम
विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
परभणी, दि. 19 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी)- एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत को ब्रँडेड आयुष्मान कार्ड निर्माणासाठी दि. 16 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत परभणी जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, या मोहिमेचा लाभ घेऊन आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
योजनांचा उद्देश/लाभः - एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.
अंगीकृत रुग्णालयांमध्ये एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील यामध्ये १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील वय ७० वर्षावरील सदस्यांना अतिरिक्त प्रति वर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार आयुष्मान भारत वय वंदना कार्डाच्या माध्यमातून देणे शक्य होईल
आयुष्मान भारत गोल्डन कार्डचे महत्व - योजने अंतर्गत लाभार्थीला प्रति वर्ष पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळवण्याकरीता आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांकडे असणे बंधनकारक आहे.
आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय मोबाईलच्या माध्यमातून गूगल प्ले स्टोर मध्ये आयुष्मान अॅप डाउनलोड करूनही कार्ड काढता येईल. तरी लाभार्थ्यांनी सदर मोहिमे अंतर्गत आयुष्मान कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
****

Comments
Post a Comment