ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत अर्ज करण्यास 27 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत अर्ज करण्यास 27 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
परभणी दि. 18 ऑगस्ट (टिळक रत्न प्रतिनिधी) : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या शासनाच्या संकेतस्थाळावर ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक निश्चित झालेले आहेत.
बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युतर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशासाठी अर्ज करण्यास दि. 27 ऑगस्ट, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अर्ज छाननी करण्यात येईल. दि. 3 सप्टेंबर रोजी पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि. 12 सप्टेंबर राहील. रिक्त जागेवर दुस-या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी दि. 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुस-या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशांची अंतिम मुदत दि. 23 सप्टेंबर, 2025 राहील.
तरी वरील वेळापत्रकानुसार शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर योजनेसाठी पात्र आसणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर https://hmas.mahait.org या शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
*-*-*-*-*

Comments
Post a Comment