Posts

कुलगुरू डॉ इंद्रमणी आयएसई शिक्षण सुवर्णपदकाने सन्मानित- केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Image
केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार श्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘प्रा. गजेन्द्रसिंह आयएसएई शिक्षण सुवर्णपदक’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल भोपाळ येथे आयोजित ‘कृषी अभियांत्रिकी नवाचार ५.०’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले सन्मानित. परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थान (सीआयएई) यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त “कृषिसाठी अभियांत्रिकी नवाचार ५.०” या विषयावर आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना कृषि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट योगदानाबद्दल “प्रा. गजेन्द्रसिंह आय.एस.ए.ई. शिक्षण सुवर्णपदक” (Prof. Gajendra Singh ISAE Education Gold Medal) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान परिषदेच्या समारोप समारंभात दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री मान...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी चे प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध डाउनलोड करून घ्या

Image
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी चे प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र विहीत मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित परीक्षार्थ्यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नानलपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून 24 वर्षीय शेख सुलेमानलां केले हद्दपार

Image
गुन्हेगारास परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) – परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील काद्राबाद प्लॉट येथे राहणारा शेख सुलेमान ऊर्फ बादल शेख सिद्दीक (वय २४ वर्षे) या इसमाविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी दुखापत करणे, जबरी चोरी, तसेच लोकसेवकावर हल्ला करून गंभीर दुखापत करणे असे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.      पोलीस अधीक्षक परदेशी व अपर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गणेश कदम व सपोनि कारवार यांनी संबंधित आरोपीविरुद्ध हद्दपार प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, परभणी यांच्याकडे सादर केला होता.     यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी शहर  डंबाळे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. सदर प्रकरणाचा पूर्ण तपास व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  उदयसिंह भोसले, उपविभागीय दंडाधिकारी, परभणी यांनी दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश जारी करून आरोपीस एक वर्षासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय दिला.   ...

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नवयुवकांना शिवमुद्रा संघटना निवडणुकीत उतरवणार

Image
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामान्य तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संधी देणार - सुर्यकांत मोगल पाटील  परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी )- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था 2025 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवमुद्रा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज अतिथी हॉटेल येथे पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरवण्यात आले की ,येणाऱ्या निवडणुकीत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना संधी देऊन त्यांच्या मागे पूर्ण ताकदिने उभे राहून सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू.  परभणी जिल्ह्यातील सत्ता परंपरागत आजप्रयत्न मोजक्याच घराण्यामध्ये राहिली आहे ही परंपरा यावेळी मोडीत काढून सामान्य कुटुंबातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देऊन सेवेचे ,विकासाचे नवे प्रारूप जनतेला  निवडणुकीत बघायला मिळणार आहे, असा निर्धार शिवमुद्रा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ,कार्यकर्त्यांनी केला आहे.  भविष्यात इतर इच्छुक सामाजिक संघटनांना एकत्रित करून लवकरच सर्व सामाजिक संघटनांची एकत्रित बैठक घेऊन पुढील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात...

तेल काढणी युनिट अनुदान तत्त्वावर हवे असेल तर त्वरित अर्ज करा

Image
तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन परभणी दि. 30 (टिळक रत्नप्रतिनिधी) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अभियान सन 2025-26 अभियान अंतर्गत जिल्ह्यात अनुदानावर 1 तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री, उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) साठी लक्षांक प्राप्त असुन प्रत्यक्ष खर्चाच्या 33 टक्के किंवा 9.90 लाख अनुदान देण्यात येणार असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी तेल काढणी युनिटसाठी  7 नोव्हेंबर 2025 पर्यंत कागदपत्रासह संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज करण्यात यावेत. तसेच सदर बाबीअंतर्गत परभणी जिल्ह्याकरीता 1 भौतिक लक्षांक असल्यामुळे 1 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडतीव्दारे निवड करण्यात येईल. सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था, सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर संबंधि...

तंबाखूमुक्त युवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणे गरजेचे - जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण

Image
परभणी जिल्ह्यात तंबाखु मुक्त युवा अभियान प्रभावीपणे राबवावे -जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी, दि. 29 (टिळक रत्न प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, परभणी) संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक बुधवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागांमार्फत कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करून परभणी जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. परभणी जिल्ह्यात तंबाखु मुक्त युवा अभियान प्रभावीपणे राबविण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी केली. बैठकीस महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा शल्यचिकित्सक व सदस्य सचिव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक आणि विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरातील पानटपऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभाग व तंबाखू नियंत्रण कक्षाला दिले. तसेच सर्व सरकारी क...

परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडत संतप्त शेतकऱ्याने केला रोष व्यक्त

Image
परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडत संतप्त शेतकऱ्याने केला रोष व्यक्त परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी): अतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत मिळाली नाही, तसेच सरकारकडून शेतकरीविरोधी धोरण राबवले जात असल्याच्या निषेधार्थ परभणीत संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९) दुपारी घडली.      संतोष रावण पैके (रा. चाटोरी, ता. पालम) असे या संतप्त शेतकऱ्याचे नाव आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्याने शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो एकरांवरील पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत.      शासनाकडून नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दिवाळी सण काळातही अनेकांनी “काळी दिवाळी” साजरी केली. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर संतोष पैके यांनी संतापाच्या भरात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत गाडी फोडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शेतकरी संतोष पैके यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने प्रशासनात ए...