तेल काढणी युनिट अनुदान तत्त्वावर हवे असेल तर त्वरित अर्ज करा
तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन
परभणी दि. 30 (टिळक रत्नप्रतिनिधी) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अभियान सन 2025-26 अभियान अंतर्गत जिल्ह्यात अनुदानावर 1 तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री, उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) साठी लक्षांक प्राप्त असुन प्रत्यक्ष खर्चाच्या 33 टक्के किंवा 9.90 लाख अनुदान देण्यात येणार असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी तेल काढणी युनिटसाठी 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत कागदपत्रासह संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज करण्यात यावेत. तसेच सदर बाबीअंतर्गत परभणी जिल्ह्याकरीता 1 भौतिक लक्षांक असल्यामुळे 1 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडतीव्दारे निवड करण्यात येईल. सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था, सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीचा लाभ घेण्यास पात्र राहतील. वरील घटकांतर्गत जमिन आणि इमारतीसाठी सहाय्य दिले जाणार नसुन तसेच प्रकल्प खर्चाची गणना करताना सदर खर्चाचा विचार केला जाणार नाही. लाभार्थ्यांनी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार सीआयपीएचइटी, लुधियाना व या सारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मिल/ ऑईल एक्पेलरची उत्पादकनिहाय तेलघाना मॉडेलला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील. त्याकरीता सदरील कोटेशन सादर करणे बंधनकारक राहील. सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांना नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
वरील निकष पुर्ण करणा-या सरकारी / खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी परीपुर्ण प्रस्ताव आपले संबंधित तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे 7 नोव्हेंबर, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.
*-*-*-*-*

Comments
Post a Comment