सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नवयुवकांना शिवमुद्रा संघटना निवडणुकीत उतरवणार
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामान्य तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संधी देणार - सुर्यकांत मोगल पाटील
परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी )- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था 2025 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवमुद्रा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज अतिथी हॉटेल येथे पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरवण्यात आले की ,येणाऱ्या निवडणुकीत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांना संधी देऊन त्यांच्या मागे पूर्ण ताकदिने उभे राहून सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू.
परभणी जिल्ह्यातील सत्ता परंपरागत आजप्रयत्न मोजक्याच घराण्यामध्ये राहिली आहे ही परंपरा यावेळी मोडीत काढून सामान्य कुटुंबातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देऊन सेवेचे ,विकासाचे नवे प्रारूप जनतेला निवडणुकीत बघायला मिळणार आहे, असा निर्धार शिवमुद्रा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ,कार्यकर्त्यांनी केला आहे.
भविष्यात इतर इच्छुक सामाजिक संघटनांना एकत्रित करून लवकरच सर्व सामाजिक संघटनांची एकत्रित बैठक घेऊन पुढील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीला शिवमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत मोगल पाटील, गजानन जोगदंड ,नितीन देशमुख , विशाल तनपुरे,विजय चट्टे, छत्रगुण अवचार ,भारत पवार, राजेभाऊ पवार, विश्वजीत काटकर, संदीप गव्हाणे ,सतीश गायकवाड ,माणिक खूपसे ,संदीप वाटुरे ,अंकुश गिरी, अनिरुद्ध गोरे ,एकनाथ भालेराव, गोविंद चव्हाण, यासह इतर सहकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment