नानलपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून 24 वर्षीय शेख सुलेमानलां केले हद्दपार

गुन्हेगारास परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी) – परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील काद्राबाद प्लॉट येथे राहणारा शेख सुलेमान ऊर्फ बादल शेख सिद्दीक (वय २४ वर्षे) या इसमाविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी दुखापत करणे, जबरी चोरी, तसेच लोकसेवकावर हल्ला करून गंभीर दुखापत करणे असे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

     पोलीस अधीक्षक परदेशी व अपर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गणेश कदम व सपोनि कारवार यांनी संबंधित आरोपीविरुद्ध हद्दपार प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, परभणी यांच्याकडे सादर केला होता.

    यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी शहर  डंबाळे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. सदर प्रकरणाचा पूर्ण तपास व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  उदयसिंह भोसले, उपविभागीय दंडाधिकारी, परभणी यांनी दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश जारी करून आरोपीस एक वर्षासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय दिला.

    नमूद आरोपी हा दि. ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी कारागृहातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर तत्काळ आदेशानुसार त्यास परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कार्यवाही करण्यात आली.

    ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम, सपोनि कारवार, पोउपनि बिक्कड, पोह. ८१६ सोडगीर, पोह. ११४३ ईशादअली, पोना. १२०० चव्हाण, पोना. ११३९ पोले, पोना. १३३४ गोला व पोशि. ३७८ मुरकुटे यांनी संयुक्तरीत्या केली.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज