तंबाखूमुक्त युवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणे गरजेचे - जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण

परभणी जिल्ह्यात तंबाखु मुक्त युवा अभियान प्रभावीपणे राबवावे -जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी, दि. 29 (टिळक रत्न प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, परभणी) संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक बुधवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागांमार्फत कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करून परभणी जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. परभणी जिल्ह्यात तंबाखु मुक्त युवा अभियान प्रभावीपणे राबविण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी केली.

बैठकीस महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा शल्यचिकित्सक व सदस्य सचिव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक आणि विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरातील पानटपऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभाग व तंबाखू नियंत्रण कक्षाला दिले. तसेच सर्व सरकारी कार्यालये व शासकीय संस्था तंबाखूमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली.

बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रक्रिया व कोटपा कायद्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच राज्यस्तरावरून सूचित करण्यात आलेल्या “तंबाखूमुक्त युवा अभियान” या साठ दिवसांच्या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली.

सर्व कार्यालये व विभागप्रमुख यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात तंबाखू, गुटखा सेवन व धुम्रपान करणाऱ्या कर्मचारी व व्यक्तींवर कोटपा कायद्यानुसार 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील किमान 30 गावे तंबाखूमुक्त घोषित करण्याचे लक्ष्य यावेळी निश्चित करण्यात आले.

*-*-*-*-*

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त