Posts

कोरोनाच्या नव्या लाटेशी सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज

Image
कोरोनाच्या नव्या लाटेशी सामना करण्यास मनपा सज्ज, मनपा आयुक्तांनी घेतला रुग्णालयांचा आढावा   परभणी, दि 27 चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात प्रशासन सतर्क झाले असून परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने देखील नवीन लाटेशी सामना करण्यासाठी कोविड परिस्थितीशी सामना करण्‍यासाठी पूर्व तयारी म्‍हणून आज दिनांक २७.१२.२०२२ रोजी परभणी शहर महानगरपालिकेच्‍या आयुक्‍त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर व नोडल अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास जगताप यांनी कोव्हिड डेडिकेटेड हॉस्‍पीटलची पाहणी केली. पाहणी मध्‍ये कोव्हिड डेडिकेटेड हॉस्‍पीटल मधील उपाययोजनांची पाहणी केली. आज रोजी परभणी शहरात महापालिकेच्‍यावतीने कल्याण मंडमप् याठिकाणी, तसेच लाईफ लाईन हॉस्‍पीटल, स्‍वाती क्रिटीकेअर हॉस्‍पीटल व सुर्या हॉस्‍पीटल येथे कोव्हिड केअर सेंटर उभारण्‍यात आल्‍याची माहिती आयुक्‍त्त तृप्‍ती सांडभोर यांनी दिली. यापैकी महानगरपालिके मार्फत कल्‍याणमंडपम् येथे उभारण्‍यात येत असलेल्‍या कोव्हिड केअर सेंटर व Oxygen Plant ची पाहणी करण्‍यात आली. कल्‍याणमंडपम् येथील ...

देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटना संतप्त

Image
 देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटना संतप्त हलाल वर त्वरित बंदी आणावी हिंदू जनजागृती समितीची मागणी  परभणी (प्रतिनिधी)- देशविघातक हलाल अर्थव्यवस्थावर सर्व हिंदुत्ववादी संघटनां संतप्त या हलाल अर्थव्यवस्थेवर त्वरित बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने पत्रकार परिषद घेऊन मांडली या पत्रकार परिषदेस ऍड सतीश देशपांडे उदय बडगुजर अजय फुलारी उपस्थित होते हलाल प्रमाणपत्र केवळ मांस पुरतेच मर्यादित न राहता खाद्यपदार्थ सौदर्याप्रसाधने औषधी हॉस्पिटल बांधकाम मॉल यासाठी सुद्धा भारतात वापर सुरू केला आहे सदरील प्रमाणपत्र करिता 47000 रु घेऊन लोगो घ्यावा लागत आहे आणि अशी प्रमाणपत्र बर्याचपैकी उत्पादक कांपनीने घेतले देखील आहेत मग ह्याबाबत उत्पादक कँपणीना प्रमाणित करण्यासाठी अधिकृत व्यवस्था अस्तित्वात असताना परत हे हलाल प्रमाणपत्र खाजगी मुस्लिम संस्था कडून का घेतले जात आहे असा प्रश्न उपस्थित होतो देशातील 15% मुस्लिम समाजाला इस्लाम आधारित हलाल हवे म्हणून 85% गैरइस्लामी जनतेवर हे लादणे संवैधानिक,ग्राहक तथा धार्मिक अधिकारच्या विरोधी आहे ह्या हलाल अर्थव्यवस्था मुळे भारतीय अ...

बेंगळुरू येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युनूस पाशा याच्यावर गुन्हा नोंद !

Image
बेंगळुरू येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युनूस पाशा याच्यावर गुन्हा नोंद ! बेंगळुरू (कर्नाटक) –  येथे अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांतर करण्यास दबाव टाकणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे या प्रकरणी युनूस पाशा फयाज अहमद याला अटक करण्यात आली आहे. पाशा याने या मुलीला एक भ्रमणभाष दिला होता. त्यावरून व्हिडिओ कॉल करून या मुलीला गुप्तांग दाखवण्यासाठी बाध्य केले होते. हा कॉल रेकॉर्ड करून तो नंतर या मुलीला ब्लॅकमेल करत होता. या मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी त्याने तिच्या घराच्या आवरात झोपेच्या गोळ्यांचा पाकीट फेकले आणि घरातील जेवणात मिसळण्यास सांगितले. मुलीने याला नकार दिल्यावर त्याने अश्‍लील चित्रीकरण उघड करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीने कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात गोळ्या मिळसल्यावर घरातील सर्वजण जेवण केल्यावर झोपी गेले. त्यानंतर युनूस तिच्या घरात आला आणि तिच्याशी विवाह करणार असल्याचे सांगत त्याने तिचे लैंगिक शोषण केले. ‘लैंगिक शोषणाची माहिती कुणाला सांगितली, तर आई-वडिलांना ठार मारीन’, अशी धमकी त्याने दिली. संपादकीय भूमिका  शरीयत कायद्यानुसार असले कृत्य करणारे व्यक्तीस कम...

शेतकरी बांधवनो शेततळे अस्तरीकरण साठी त्वरित अर्ज करा

शेतकरी बांधवांनो शेततळे  अस्तरीकरणासाठी  अर्ज करा  परभणी, दि. 24 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सामूहिक व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. पाणीसाठा निर्माण करणे व साठवलेले पाणी वाया जावू नये, तसेच उन्हाळ्यात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा वापर व्हावा, या हेतूने 50 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतक-यांनी तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गंत 100 टक्के अनुदानावर शेततळ्याची योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतक-यांनी महाडीबीटी (mahadbtmahait.gov.in) पोर्टलवर अर्ज करावेत, तसेच अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ****

1 डिसेंबर पासून कलम 36 लागू राहील

  जिल्ह्यात एक डिसेंबरपासून कलम  36  लागू   परभणी  दि .24 :-    जिल्ह्यात डॉ .  बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ,  बाबरी मशीद  – रामजन्मभूमी संदर्भाने सर्व धर्म वेगवेगळा दिवस पाळतात .  तसेच राज्यातील शेतकरी संघटनेतर्फे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ,  यासाठी  1  ते  15  डिसेंबरदरम्यान मुंबई पोलीस कायदा कलम  36  लागू करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर .  यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे . परभणी जिल्ह्यात या कलमाअन्वये पोलीस विभागाची तारीख ,  वेळ ,  सभेची जागा ,  मिरवणुकीचा मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा निश्चित केल्याशिवाय आयोजित करु नयेत .  तसेच यादरम्यान कोणत्याही नियमांचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही ,  याची काळजी घ्यावी .  हा आदेश लग्न वरात ,  प्रेतयात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू होणार नाही .  असे त्यांनी आवाहनात सांगितले आहे .

कपाळावर तिलक गंध का लावावे - स्वामी नारायनदास महाराज,

Image
 कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तू कपाळावर ही विभूती का लावतोस?' त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, 'माझी आई मला सांगते म्हणून!' मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. *'देह देवाचे मंदिर' असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे...

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांचा आदेश !

Image
  अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांचा आदेश ! मुंबई  – अन्न आणि औषध प्रशासनाकडून १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यातील विक्रेत्यांकडील चिकन अन् मासे यांची पडताळणी करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याविषयी आदेश काढले. याआधी केवळ स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून त्यांची पडताळणी केली जात असे; पण आता त्यांचे नमुनेही पडताळण्यात येणार आहेत. खरेतर कायद्यात तशी तरतूद असतांनाही आतापर्यंत तसे झाले नाही.  (गेली १५ वर्षे या संदर्भातील कायद्याची कार्यवाही न करणार्‍या अधिकार्‍यांवरच कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक)  प्रशासनाच्या प्रयोगशाळेत अशी पडताळणी न झाल्याने, तसेच सुविधांचा अभाव असल्यामुळे खासगी प्रयोगशाळेत हे नमुने पडताळणीसाठी पाठवले जाणार आहेत.  (प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील असुविधा तातडीने दूर करायला हव्यात ! – संपादक)