Posts

ऐतिहासिक वारसा असणारी पंजाबी भाषा आहे - कुलगुरू डॉ उद्धव भोसले

Image
 पंजाबी भाषेला एैतिहासिक वारसा आहे  : कुलगुरू डॉ. उद्धव भोसले  नांदेड (टिळकरत्न प्रतिनिधी) : पंजाबी भाषा ही एक महत्वाची भारतीय भाषा आहे. पंजाबी भाषेला एैतिहासिक वारसा आहे. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. विद्यापीठातील श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या बेसिक पंजाबी भाषा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरीत करताना ते बोलत होते.   यावेळी कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, स. किरणजीतकौर, या केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक शिंदे, उपकुलसचिव व्ही. पी. रामतीर्थे यांची प्रमुख उपस्थिती होती.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पुढाकार घेतल्याने श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला सुरळीत चालवण्याकरिता श्री. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सहकार्य केले जाते.  पुढे कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले की, विद्यापीठातील श्री. गुरु गोबिंदसिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र जागतिक दर्जाचे होईल व त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य ...

राज्य सरकारच्या आश्वासन आतिषबाजी मुळे,शेतकऱ्यांची दिवाळी काळी

Image
आश्वासनांची आतषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूक खोटारड्या महाविकास आघाडी सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी ! भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांचा आरोप  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी): ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास  महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची तसेच शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी शनिवार पत्रकार परिषदेत केली. राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीच...

स्वा वीर सावरकर टपाल तिकिट च्या किमत, म्हणजे तीच राष्ट्रभक्तांची किंमत असे कोणीही ठरवू नये - हिंदू जनजागृती समिती

Image
  टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्तांची किंमत ठरत नसते  !  -  हिंदु जनजागृती समिती       स्वा .  विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणार्‍या काँग्रेसच्या उर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते .  वीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान स्व .  इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट काढले ;  मात्र आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे त्यावर टिप्पणी करून आपल्या नेत्यांचा अपमान करत आहेत .  जर इंदिरा गांधी यांनी स्वा .  सावरकर यांच्यापेक्षा माकडाच्या तिकिटाची किंमत अधिक ठेवली ,  असे मंत्री महोदयांना म्हणायचे असेल ,  तर काँग्रेसी संस्कृतीत आज देशभक्तांपेक्षा मर्कट उड्या मारणार्‍यांना अधिक महत्त्व का आले आहे ,  हे त्यातून लक्षात येते .  माननीय मंत्रीमहोदय ,  एखाद्या टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते ,  याचे भान ठेवा ,  असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे .      राष्ट्रभक्तांची किंमत जर टपाल तिकिटांवर ठरव...

वनामकृवि 23 वा दीक्षांत समारंभ 25 ऑक्टोबर रोजी

Image
  वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी दीक्षांत समारंभात तीन वर्षातील १० , ९९७ स्‍नातकांना विविध पदवीने  अनुग्रहीत  करण्‍यात येणार  .......  कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची पत्रकार परिषदेत माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १ १ . ०० वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू ,  दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्‍यक्ष तथा कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ मा डॉ सी डी मायी हे उपस्थित राहुन दीक्षांत भाषण करणार आहे ,  अशी माहिती कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिनांक २३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली . पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले ,  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर ,  विस्‍तार शिक्षण संच...

इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी :   जिल्हाधिकारी   सुनील चव्हाण

Image
 इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी :   जिल्हाधिकारी   सुनील चव्हाण प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार, फॉरमोसो आणि अहमनी उद्योगाला केले आवाहन  औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी)  :  औरंगाबाद परिसरात उद्योगाला पुरक  पायाभुत सुविधा उपलब्ध असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीला आलेले आहेत. सध्या बाजारात इलेक्ट्रीकल वाहनांना मोठी मागणी असल्याने  ऑरीक सिटीमध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी केले.            हॉटेल ताज येथे तैवान मधील तयत्रा या संस्थेच्या पुढाकारातुन आयोजित एका सेमिनारमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी  तयात्राचे  संचालक वेलबर्ग वँग, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती कंपनी अहमनीच्या सचिव श्रीमती ची, तयत्राच्या पदाधिकारी हरजीत गुलाटी, यांच्यासह औरंगाबाद बिझनेस डेव्हलपमेंट क्लस्टरचे पदाधिकारी रमण अजगावकर, रविंद्र कोंडेकर, श्रीधर वेलंगी, श्रीकांत जोशी यांसह उद...

दिवाळीच्या भेटवस्तू फराळ ग्रामीण भागातील बचत गटाकाडून खरेदी करावीत

Image
 दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू आणि साहित्य ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन - डॉ. हेमंत वसेकर   परभणी,(टिळक रत्न प्रतिनिधी) . : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी उद्योग क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्राला केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांची व्यापक चळवळ अत्यंत प्रभावीपणे राज्यात राबविली जात आहे. गरिबी निर्मूलनाचे ध्येय असलेल्या या राष्ट्रीय ध्वजांकित कार्यक्रमात ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटीत केले आहे. अभियानात महिलांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यात आलेले आहे. अभि...

गोपाळकाला म्हणजे श्रीकृष्नणा चा अमृत तुल्य प्रसाद - हभप जयश्री महाराज तिकांडे

Image
श्रीकृष्णाच्या हातचा अतुल्य प्रसाद म्हणजे गोपालकाला - हभप जयश्री महाराज तिकांडे मीनाताई ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता  वैजापूर (टिळक रत्न प्रतिनिधी): औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता झाली. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार रमेश बोरणारे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कृष्णाने सकाळीच घाइघाईत सगळे मित्र सवंगड्यांना आवाज दिला अन सर्वांनी आपापल्या घराततील शिदोर्‍या घेऊन गाई चारण्यासाठी रानात गेले. दुपारी सगळ्यांनी आपापल्या शिदोर्‍या सोडल्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्या शिदोर्‍या एकत्र करून त्याचा काला केला. नंतर तो काला सर्वजण एकमेकांना प्रेमाने भरवू लागले. असा कृष्णाच्या हातचा अमुल्य प्रसाद म्हणजेच गोपालकाला असल्याचा श्रीकृष्णाच्या हातचा अतुल्य प्रसाद म्हणजे गोपालकाला - हभप जयश्री महाराज तिकांडे मीनाताई ठाकरे राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सवाची सांगता वैजापूर : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरी...