ब्रह्मकुमारी शिवानी दीदींचे परभणी मध्ये 'खुशियों का पासवर्ड' अध्यात्मिक व मार्गदर्शक व्याख्यान
परभणीत ब्रह्मकुमारी शिवानी दीदींचे 'खुशियों का पासवर्ड' अध्यात्मिक व मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन!
परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी):- प्रसिद्ध जीवन प्रबंधन विशेषज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी येथे 'खुशियों का पासवर्ड' या विशेष मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपतीद्वारा 'नारीशक्ती पुरस्कार २०१८' ने सन्मानित झालेल्या शिवानी दीदी या कार्यक्रमातून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन दिनांक: सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ संध्याकाळी ५:३० ते ८:०० वाजेपर्यंत ,अश्वमेध ग्राउंड, विद्यार्थी कल्याण कार्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी (Registration) करणे आवश्यक असून, त्यासाठी omshanti.in/bks या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा QR कोडचा वापर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment