श्री परशुराम चषक 2026 संपन्न

 परशुराम चषक 2026 संपन्न

स्वा. सावरकर संघ रत्नागिरी ठरला पहिल्या पारितोषिकाचा मानकरी



पुणे (टिळक रत्न प्रतिनिधी)-: परशुराम हिंदू सेवा संघाच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्म्स येथे दोन दिवसीय परशुराम चषक 2026 फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात होती. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस ऋषिकेश सुमंत संपर्कप्रमुख स्वप्निल कुलकर्णी सागर मांडके शहराध्यक्ष शैलेश खोपटीकर आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष आनंद दवे, मनोज तारे विजय शेकदार उपक्रम प्रमुख विवेक लोहारेकर सहप्रमुख किशोर होले आदींची पहिल्या दिवशी उपस्थिती होती तर दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध पत्रकार सुशील कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते अमोल सणस पी टी काळे ओंकार जोशी बाळासाहेब कुलकर्णी प्रसन्न पुराणिक प्रशांत पोमण आदींची उपस्थिती होती. शनिवार 10 जानेवारी व रविवार 11 जानेवारी असे दोन दिवसाचे आयोजन होते शनिवारी पहिल्या दिवशी एकूण राज्यातील विविध शहरांमधून आलेले सात संघ सामने खेळले प्रामुख्याने पहिल्या दिवशी व्ही के एस स्पोर्ट्स, कल्याण ब्राह्मण मित्र मंडळ, मोरया 11, अश्वमेध पुणे, वाकण क्रिकेट संघ, वेदश्री 11 आळंदी, मृत्युंजय 11 या संघांमध्ये सामने खेळवण्यात आले यामध्ये अश्वमेध पुणे हा संघ पहिल्या दिवसाचा उत्तम संघ निवडला गेला रविवारी विविध शहरांमधून आलेले आठ संघ खेळले ज्यामध्ये प्रामुख्याने नादब्रह्म, रायझिंग स्टार, PMR , सहयोग डोंबिवली, स्वा.वीर सावरकर संघ रत्नागिरी, होय रे महाराजा, परशुराम स्पोर्ट कोल्हापूर, एकदंत 11यांचा समावेश होता अंतिम सामना स्वा.वीर सावरकर संघ रत्नागिरी व अश्वमेध पुणे यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला ज्यात स्वा. वीर सावरकर संघाने प्रथम पारितोषिक रू 40000 पटकावले अश्वमेध संघाने द्वितीय पारितोषिक रु 30000 पटकावले परशुराम स्पोर्ट्स कोल्हापूर व एकदंत ११ या दोन्ही संघानी तृतीय व चतुर्थ पारितोषिक रु 15000 पटकावले.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज