महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 इंत्र्गत परभणी उदयोन्मुख जिल्हा म्हणून समाविष्ट

महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 इंत्र्गत परभणी उदयोन्मुख जिल्हा म्हणून समाविष्ट - परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याला आली यश

परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- परभणी जिल्ह्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत महत्त्वाचा  निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेहमीच प्रयत्न असतो की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. या व्यापक उद्दिष्टामध्ये परभणी जिल्ह्याचाही समावेश व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले आहेत.

नवीन धोरणांतर्गत झोन–१ मध्ये समावेश झाल्यामुळे परभणीतील गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती मिळणार आहेत. तसेच परभणी जिल्हा  “डी+ श्रेणी” मध्ये कायम ठेवण्यात आला असून, या झोनमध्ये राज्यातील सर्वाधिक औद्योगिक प्रोत्साहन सवलती दिल्या जातात. या निर्णयामुळे नवीन उद्योग, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न