विद्यार्थ्यानी गणेश उत्सवात एक तरी कला आत्मसात करून जोपासण्याचा प्रयत्न करावा
विद्यार्थ्यानी गणेश उत्सवात एक तरी केला आत्मसात करून जोपासण्याचा प्रयत्न करावा - मंदार कुलकर्णी संपादक टिळक रत्न
एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल येथे श्री गणेशाच्या आरती निमित्ताने व्यक्त केले मनोगत
परभणी दि4 सप्टेंबर (प्रतिनिधि ):- येथील खंडोबा बाजार मधील एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल शाळेमध्ये श्री गणेशाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते साप्ताहिक टिळक रत्न चे संपादक मंदार कुलकर्णी यांनी प्रभू श्री गणेश हे विद्येचे कलेची देवता आहे गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी एखादी तरी कला आत्मसात करून ती जोपासण्याचा प्रयत्न जरूर करावा असे प्रतिपादन केले.
एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल मुख्य शाखेत मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली. सर्व मान्यवर हे ह्याच प्रशालेचे विविध क्षेत्रातील कर्तुत्वान माजी विद्यार्थी होत. यामध्ये श्री रमेश शिर्के (समाजसेवक), श्री संतोष पाठक ( पंचायत समिती ) मंदार कुलकर्णी (संपादक टिळक रत्न ) आकाश साळवे( समाजसेवक, आयआयटी रूडकी येथून उत्तीर्ण) याप्रसंगी पालक प्रतिनिधी सौ अनिता वाघमारे वरील मान्यवरांची उपस्थिती लाभली. आजच्या आरतीचे आयोजन इयत्ता दहावी अ च्या वर्गशिक्षिका व त्या पण माजी विद्यार्थिनी सौ सविता गबाळे यांच्या वतीने करण्यात आले. आज ई. ५ वी अ मधील विद्यार्थीनी कु.आदिश्री ठाकूर हिचा वाढदिवस होता मान्यवरांच्या हस्ते तिला शुभेच्छा कार्ड व पुष्पहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी संसदेच्या सल्लागार सौ सुरेखा गीते यांनी केले. मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री बाळकृष्ण कापरे व सहकाऱ्यांनी केले.



Comments
Post a Comment