परभणीतून मुंबईतील आंदोलनकर्त्यांना प्रतिदिन रसद पुरवठा परभणीतील सकल मराठा समाज बांधवांचा उपक्रम

परभणीतून मुंबईतील आंदोलनकर्त्यांना  प्रतिदिन रसद पुरवठा 
परभणीतील सकल मराठा समाज बांधवांचा उपक्रम



परभणी,दि.01(टिळक रत्न प्रतिनिधी) : मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत आमरण उपोषणात सहभागी आंदोलनकर्त्यांकरीता सकल मराठा समाजबांधवांनी परभणी येथून दररोज शिदोरी पाठविण्यास सुरुवात केली आहे.  मुंबईतील आंदोलनकर्त्यांना जेवण सामग्री उपलब्ध व्हावे या दृष्टीने येथील सकल मराठा समाजबांधवांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन केले होते तेव्हा चार ते पाच गावांमधून या आवाहनकर्त्यांना शिदोरी म्हणून चटणी, भाकरी, ठेचा, लोणचं यासह चिवडा व अन्य फराळाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले. समाजबांधवांनी ती शिदोरी लगेचच मुंबईस रवाना केली व मुंबईतील आंदोलनकर्त्यांना आंदोलन यशस्वी होईपर्यंत शिदोरी कमी पडता कामा नये, या उदात्त हेतूने दररोज 30 ते 35 हजार जणांना पुरेल एवढे अन्न पाठविण्यास सुरुवात केली. या उपक्रमास समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भारावलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी होईपर्यंत शिदोरीची ही रसद पुरविण्याचा संकल्प सोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त