परभणीत 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दुर्गामाता दौड : विजयादशमीला महादौडीने समारोप ः श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानतर्फे आयोजन

 परभणीत 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दुर्गामाता दौड : विजयादशमीला महादौडीने समारोप ः श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानतर्फे आयोजन



परभणी,दि.19 सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त परभणी शहरासह तालुका व परिसरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड 22 सप्टेंबरपासून सुरू होऊन 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी महादौडीने संपन्न होणार आहे.

           दररोज सकाळी सहा वाजता परभणी शहर तसेच विविध गावांमधून ही दौड काढण्यात येणार असून दहा दिवस शहरातील ठराविक ठिकाणी एकत्रिकरण होणार आहे. नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत संपूर्ण परभणी शहरात व्यापक स्वरूपात दौडीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही दौड 22 सप्टेंबर रोजी गांधी पार्क, 23 सप्टेंबर श्री स्वामी समर्थ मंदिर सिंचन नगर, 24 सप्टेंबर सद्गुरुनगर जुना पेडगाव रोड, 25 सप्टेंबर श्री माऊली मंदिर विद्यानगर, 26 सप्टेंबर स्व. बाळासाहेब ठाकरे कमान जिंतूर रोड, 27 सप्टेंबर श्री शिवाजी महाविद्यालय वसमत रोड, 28 सप्टेंबर देशमुख हॉटेल कारेगाव रोड, 29 सप्टेंबर श्री पारदेश्वर मंदिर, 30 सप्टेंबर श्री गणपती चौक जिंतूर रोड, 1 ऑक्टोबर श्री शिवाजी महाराज चौक तर 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त सकाळी सहा वाजता श्री अष्टभुजा देवी मंदिर येथे एकत्र येऊन महादौड काढण्यात येणार असून देवीच्या महाआरतीने यावर्षीच्या दौडीचा समारोप होणार आहे.

           या दौडमध्ये सर्व तरुण, युवक-युवती व नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणी विभागाचे अध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज