Posts

Showing posts from September, 2025

पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी

Image
पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी-- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण पदवीधर निवडणुकीकरिता प्रत्येक मतदारांनी निवडणुकीच्या आधी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे जुने यादी मध्ये नाव असले तरी पुन्हा फॉर्म भरून नोंदणी करणे गरजेचे परभणी, दि. 30 (टिळक रत्न प्रतिनिधी) : 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. सन-2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त पात्र पदवीधर मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, नायब तहसिलदार सतीश रेड्डी व पत्रकार  यावेळी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी म्हणाले की, पदवीधर नाव नोंदणीसाठी  फॉर्म नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे.  हा फॉर्म सर्व तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी महस...

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश मुंबई, दि. ३० सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी) : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देशही बँकाने दिल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पू...

राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

Image
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा,  राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन मुंबई दि.२८ सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी):- भारतीय हवामान विभागाकडून २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे . राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत.  घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होवू शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने जिल्...

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ शक्यता

Image
 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ अपेक्षित मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड, लातूर धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावीत दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे  मुंबई, दि 25 सप्टेंबर ( टिळक रत्न प्रतिनिधी ) - बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.  26 तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपार नंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवा...

परभणीत 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दुर्गामाता दौड : विजयादशमीला महादौडीने समारोप ः श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानतर्फे आयोजन

Image
 परभणीत 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दुर्गामाता दौड : विजयादशमीला महादौडीने समारोप ः श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानतर्फे आयोजन परभणी,दि.19 सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त परभणी शहरासह तालुका व परिसरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड 22 सप्टेंबरपासून सुरू होऊन 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी महादौडीने संपन्न होणार आहे.            दररोज सकाळी सहा वाजता परभणी शहर तसेच विविध गावांमधून ही दौड काढण्यात येणार असून दहा दिवस शहरातील ठराविक ठिकाणी एकत्रिकरण होणार आहे. नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत संपूर्ण परभणी शहरात व्यापक स्वरूपात दौडीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही दौड 22 सप्टेंबर रोजी गांधी पार्क, 23 सप्टेंबर श्री स्वामी समर्थ मंदिर सिंचन नगर, 24 सप्टेंबर सद्गुरुनगर जुना पेडगाव रोड, 25 सप्टेंबर श्री माऊली मंदिर विद्यानगर, 26 सप्टेंबर स्व. बाळासाहेब ठाकरे कमान जिंतूर रोड, 27 सप्टेंबर श्री शिवाजी महाविद्यालय वसमत रोड, 28 सप्टेंबर देशमुख हॉटेल का...

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे उल्लेखनीय योगदान

Image
 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे उल्लेखनीय योगदान - पालकमंत्री मेघना बोर्डीकर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत केली जाईल   परभणी, दि. 17 सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी) - मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही  कवटाळले. या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रेरणेने  जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी  आपण वाटचाल करुयात, असे प्रतिपादन राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. परभणी येथील राजगोपालचारी उद्यान येथे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावे...

स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा १७ सप्टेंबरपासून शुभारंभ

Image
 “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा १७ सप्टेंबरपासून शुभारंभ महिला, मुली व बालकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन परभणी, दि. १६ सप्टेंबर (टिळकरत्न प्रतिनिधि) --- महिलांचे आरोग्य हे प्रत्येक महिलेसाठी व तिच्या कुटुंबासाठी बहुमोल आहे.महिला निरोगी असेल तर कुटुंब सशक्त व निरोगी राहते.या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत   संपूर्ण राज्यात *"स्वस्थ नारी,सशक्त परिवार"* अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने बहुसंख्येने महिला, मुली व बालकांचे आरोग्य तपासणी  व आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामधून संसर्गजन्य आजार व असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.  शिबिराचे आयोजन ग्रामीण व शहरी रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी विशेष तज्ञांच्या मार्फत  करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने  महिलांची उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग, क्षयरोग, तपासण...

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची निवड

Image
अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची निवड  सोनपेठ दि 13 सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी) :- अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची तर उपाध्यक्षपदी गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर तर सचिव पदावर श्री गुरु ष.ब्र.१०८  विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनपेठ दि १३ सप्टेंबर 2025 श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे अखिल भारत वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्री गुरु ष.ब्र.१०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज नारायणसूरकर/रेवूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष गुरु ष.ब्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.या सभेत  अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची, उपाध्यक्षपद...

वीर सावरकर मंच तर्फे 16 सप्टेंबरला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना अंदमानची सफर

Image
16 सप्टेंबर रोजी परभणीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ; वीर सावरकर मंचातर्फे आयोजन; विजेत्यांना अंदमानाची सफर परभणी  दिनांक 10 सप्टेंबर ( टिळक रत्न प्रतिनिधी) - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे येथील वीर सावरकर विचारमंच संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही स्पर्धा ईयत्ता 10 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दि.  16 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून  स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विजेत्यांना वीर सावरकरांच्या निवासाने पावन झालेल्या अंदमान बेटाची सफर घडविण्यात येणार आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा वारसा चालवण्याच्या उद्देशाने परभणी येथे वीर सावरकर विचारमंच या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्र व विचाराच्या अनुषंगाने विषय दिला जातो. यावर्षी ‘साहित्यिक सावरकर’ हा विषय देण्यात आला असून ...

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

Image
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ मुंबई, दि. १२ (टिळक रत्न प्रतिनिधी)  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत. *जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे* राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील. * उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग* या अभियानात महाराष्ट्र आर...

परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव

Image
  परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव परभणी दि 12 सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी ) - परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे.  ग्रामविकास मंत्रालयाद्वारे शुक्रवारी (दि.12) मुंबईत जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आरक्षण निश्‍चिततेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भंडारा व गोंदिया या दोन जिल्हा परिषद अपवाद अन्य एकूण 32 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची निश्‍चिती करण्यात आली. जिल्हा परिषद गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणार्‍या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. यामध्ये परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. या संबंधीची अधिसूचनाही ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव ए.एम. भरोसे यांनी शुक्रवारी लागू केली.

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा चे आयोजन

Image
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजा स्व अभियानांतर्गत महसूल पंधरवडा चे आयोजन - जिल्हाधिकारी संजय चव्हाण दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान तीन टप्प्यांमध्ये जिल्हाभरत अभियान राबवले जाणार जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती. प्रशासन हे शासनामार्फत दिलेल्या निर्देशानुसार अभियान आणि कार्यक्रम राबवत असते नागरिकांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करणे गरजेचे असते जिल्हाधिकारी संजय चव्हाण. परभणी दि 12 सप्टेंबर ( टिळक रत्न प्रतिनिधी) - दिनांक 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०२५ दरम्यान तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत महसूल पंधरवाडा चे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत दिली. महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याचा विषयाशी अत्यंत जवळून संबंध असलेल्या विभाग आहे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त व 17 सप्टेंबर 25 ते राष्ट्रपिता...

शेत रस्ते सीमांकन मोहीम प्रशिक्षण संपन्न

Image
शेत रस्ते सीमांकन मोहीम प्रशिक्षण संपन्न - रस्त्याचे अद्यावत नोंदणीकरण करून ग्रामीण भागातल्या रस्त्यावरील अतिक्रमण मुक्ती मोहीम राबवण्याचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे  निर्देश  होणार            परभणी,दि.10(टिळक रत्न प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील रस्त्यांचे अद्यावत नोंदणीकरण व अतिक्रमण मुक्ती ही काळाची नितांत गरज ठरली असून संबंधित यंत्रणांनी सर्व रस्ते मोकळे करावेत व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिले आहेत.           येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण रस्ते या संदर्भात बुधवारी विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात ग्रामीण भागातील शेतरस्ते, गाडी मार्ग, पाय मार्ग, यांचे सीमांकन, नोंदणीचे अद्यावतीकरण, अतिक्रमण हटावो मोहिम, तसेच प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र क्रमांक देण्याची पध्दती या बाबत तपशीलवार माहिती व चर्चाही करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ग्रामीण रस्त्या संदर्भात 29 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने स्पष्ट असे निर्देश दिले आहेत. त्या प्रमाणे शासन निर्ण...

विद्यार्थ्यानी गणेश उत्सवात एक तरी कला आत्मसात करून जोपासण्याचा प्रयत्न करावा

Image
विद्यार्थ्यानी गणेश उत्सवात एक तरी केला आत्मसात करून जोपासण्याचा प्रयत्न करावा - मंदार कुलकर्णी संपादक टिळक रत्न  एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल येथे श्री गणेशाच्या आरती निमित्ताने व्यक्त केले मनोगत परभणी दि4 सप्टेंबर (प्रतिनिधि ):- येथील खंडोबा बाजार मधील एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल शाळेमध्ये श्री गणेशाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते साप्ताहिक टिळक रत्न चे संपादक मंदार कुलकर्णी यांनी प्रभू श्री गणेश हे विद्येचे कलेची देवता आहे गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी एखादी तरी कला आत्मसात करून ती जोपासण्याचा प्रयत्न जरूर करावा असे प्रतिपादन केले. एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल मुख्य शाखेत मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली. सर्व मान्यवर हे ह्याच प्रशालेचे विविध क्षेत्रातील कर्तुत्वान माजी विद्यार्थी होत. यामध्ये श्री रमेश शिर्के (समाजसेवक), श्री संतोष पाठक ( पंचायत समिती )  मंदार कुलकर्णी (संपादक टिळक रत्न )  आकाश साळवे( समाजसेवक, आयआयटी रूडकी येथून उत्तीर्ण) याप्रसंगी पालक प्रतिनिधी सौ अनिता वाघमारे  वरील मान्यवरांची उपस्थिती लाभली. आजच्या आरतीचे आयोजन इ...

परभणीतून मुंबईतील आंदोलनकर्त्यांना प्रतिदिन रसद पुरवठा परभणीतील सकल मराठा समाज बांधवांचा उपक्रम

Image
परभणीतून मुंबईतील आंदोलनकर्त्यांना  प्रतिदिन रसद पुरवठा  परभणीतील सकल मराठा समाज बांधवांचा उपक्रम परभणी,दि.01(टिळक रत्न प्रतिनिधी) : मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत आमरण उपोषणात सहभागी आंदोलनकर्त्यांकरीता सकल मराठा समाजबांधवांनी परभणी येथून दररोज शिदोरी पाठविण्यास सुरुवात केली आहे.  मुंबईतील आंदोलनकर्त्यांना जेवण सामग्री उपलब्ध व्हावे या दृष्टीने येथील सकल मराठा समाजबांधवांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन केले होते तेव्हा चार ते पाच गावांमधून या आवाहनकर्त्यांना शिदोरी म्हणून चटणी, भाकरी, ठेचा, लोणचं यासह चिवडा व अन्य फराळाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले. समाजबांधवांनी ती शिदोरी लगेचच मुंबईस रवाना केली व मुंबईतील आंदोलनकर्त्यांना आंदोलन यशस्वी होईपर्यंत शिदोरी कमी पडता कामा नये, या उदात्त हेतूने दररोज 30 ते 35 हजार जणांना पुरेल एवढे अन्न पाठविण्यास सुरुवात केली. या उपक्रमास समाजबांधवांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भारावलेल्या का...