स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा १७ सप्टेंबरपासून शुभारंभ

 “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा १७ सप्टेंबरपासून शुभारंभ

महिला, मुली व बालकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन



परभणी, दि. १६ सप्टेंबर (टिळकरत्न प्रतिनिधि) --- महिलांचे आरोग्य हे प्रत्येक महिलेसाठी व तिच्या कुटुंबासाठी बहुमोल आहे.महिला निरोगी असेल तर कुटुंब सशक्त व निरोगी राहते.या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत   संपूर्ण राज्यात *"स्वस्थ नारी,सशक्त परिवार"* अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या अभियानात प्रामुख्याने बहुसंख्येने महिला, मुली व बालकांचे आरोग्य तपासणी  व आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामधून संसर्गजन्य आजार व असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. 

शिबिराचे आयोजन ग्रामीण व शहरी रुग्णालय, महानगरपालिका रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी विशेष तज्ञांच्या मार्फत  करण्यात येणार आहे.

यात प्रामुख्याने  महिलांची उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग, क्षयरोग, तपासणी,महिला-किशोरवयीन मुलींना पोषण, मासिक पाळी, रक्तक्षय तपासणी समुपदेशन, गर्भवती महिलांसाठी प्रसूती पूर्व काळजी, तपासणी औषध उपचार व मुलांना लसीकरण सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. याशिवाय रक्तदान मोहीम अवयवदान,PMJAY नोंदणी. आयुष्यमान वंदना कार्ड, निक्षय मित्र स्वयंसेवकाची नोंदणी आशा विविध आरोग्य योजनांचा लाभ  अभियानात महिलांना मिळणार आहे. 

तरी सदरील शिबिराचा लाभ  बहुसंख्येने महिला व मुलींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त