जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा चे आयोजन

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजा स्व अभियानांतर्गत महसूल पंधरवडा चे आयोजन - जिल्हाधिकारी संजय चव्हाण

दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान तीन टप्प्यांमध्ये जिल्हाभरत अभियान राबवले जाणार जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती.

प्रशासन हे शासनामार्फत दिलेल्या निर्देशानुसार अभियान आणि कार्यक्रम राबवत असते नागरिकांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करणे गरजेचे असते जिल्हाधिकारी संजय चव्हाण.

परभणी दि 12 सप्टेंबर ( टिळक रत्न प्रतिनिधी) - दिनांक 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०२५ दरम्यान तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत महसूल पंधरवाडा चे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत दिली.
महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याचा विषयाशी अत्यंत जवळून संबंध असलेल्या विभाग आहे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त व 17 सप्टेंबर 25 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याची शासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे 
सेवा पंधरवडा हा उपक्रम यापूर्वीपासून राबविण्यात येत होता पंधरवड्यादरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे उपक्रम या अभियानांतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे या अभियानांतर्गत सतत उपक्रम मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे प्रशासन स्तरावर तयारी झाल्याचे परभणी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत जिल्हाभरात दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सेवा पंधरवाडा जिल्हाभरात अभिनेता येणार आहे सदर अभियान तीन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे पहिल्या टप्प्यांमध्ये पानंदरस्ते विषयक मोहीम दुसऱ्या टप्प्यांमध्ये सर्वांसाठी घरी या उपक्रमासाठी पूरक उपक्रम तसेच तिसऱ्या टप्प्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पात परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे असा आहे. 
सदरील सेवा पंधरवाडा जिल्हा भरात तालुका ग्राम पातळीवर प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न प्रशासन प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी या सेवा पंधरवड्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न