परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव

 परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव

परभणी दि 12 सप्टेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी ) - परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. ग्रामविकास मंत्रालयाद्वारे शुक्रवारी (दि.12) मुंबईत जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आरक्षण निश्‍चिततेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भंडारा व गोंदिया या दोन जिल्हा परिषद अपवाद अन्य एकूण 32 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची निश्‍चिती करण्यात आली. जिल्हा परिषद गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणार्‍या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. यामध्ये परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. या संबंधीची अधिसूचनाही ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव ए.एम. भरोसे यांनी शुक्रवारी लागू केली.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त