वीर सावरकर मंच तर्फे 16 सप्टेंबरला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना अंदमानची सफर
16 सप्टेंबर रोजी परभणीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ;वीर सावरकर मंचातर्फे आयोजन; विजेत्यांना अंदमानाची सफर
परभणी दिनांक 10 सप्टेंबर ( टिळक रत्न प्रतिनिधी) - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे येथील वीर सावरकर विचारमंच संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ईयत्ता 10 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दि. 16 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विजेत्यांना वीर सावरकरांच्या निवासाने पावन झालेल्या अंदमान बेटाची सफर घडविण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा वारसा चालवण्याच्या उद्देशाने परभणी येथे वीर सावरकर विचारमंच या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्र व विचाराच्या अनुषंगाने विषय दिला जातो. यावर्षी ‘साहित्यिक सावरकर’ हा विषय देण्यात आला असून स्पर्धेसाठी ईयत्ता 10 वी ते 12 वी वर्गातील विद्यार्थी महाविद्यालयाच्या वतीने 14 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करू शकतील. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करणार्या विजेत्या स्पर्धकांना अंदमान यात्रा हे बक्षिस असणार आहे. तर दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. ही स्पर्धा परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात 16 सप्टेंबर रोजी होणार असून या स्पर्धेचे वितरण 17 सप्टेंबर रोजी याच सभागृहात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉ.नविनचंद्र मोरे (मो.8379871278), गिरीष रत्नपारखी (मो.9975514226), विनोद डावरे (मो.9765998999), प्रशांत भरणे (मो.9960209108) यांच्याशी संपर्क करावा. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन वीर सावरकर विचारमंचच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment