पूजा खेडकर यांना दिलेले आय. ए. एस. पद रद्द करण्याची मागणी

 पुजा खेडकर यांना दिलेले आय.ए.एस. पद रद्द करण्याची रुग्ण हक्क संरक्षण समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी



 परभणी ( प्रतिनिधी ) आज दिनांक 12 जुलै रोजी शहरातील रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यशील असलेली रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने पुजा खेडकर हिने अंशतः दृष्टिहीन आणि मानसिक दृष्टया विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यातून तीला आय.ए.एस. परिक्षेत 821 श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळाले होते. त्या आधी तीने एम.बी.बी.एस. केलेले आहे. पुजा खेडकर हीने दृष्टीहीन आणि मानसिक दृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दाखल करुन तीने त्या कोठयातून परिक्षा दिली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे ब्रेन्च ची पात्रता नसतांनाही तीने खोटे व बनावटी कागदपत्रे दाखल करुन ही दिशाभूल करुन आय.ए.एस. चे पद घेतले आहे. यामुळे जे अपंग आहेत, अभ्यासू आहेत, जे खरोखरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान केलेल आहे, हे पद देशातील नौकरीमधील सर्वोच्च नौकरीचे पद आहे. व यापदाला सगळ्यात जास्त विश्वास व मान आहे. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री यांचा सल्लागार म्हणून, पंतप्रधानाचा सल्लागार म्हणून, इंडियन फोरन सर्व्हिस, इंडियन अॅम्बेसी, अशा महत्वाच्या जागेवर अशा व्यक्तीला पाठविल्या जाते त्यात अशी पुजा खेडकर सारखी व्यक्ती पाठविली तर आपल्या देशाची न भरून निघणारी हाणी होईल. म्हणून पुजा खेडकर हिला त्या पदावरुन मा. राष्ट्रपती, यानी काढून टाकावे. तसेच तीने दाखल केलेले मेडीकल सर्टिफिकेट ज्या डॉक्टरने दिले त्यांचे सुध्दा लायसन्स रद्द करण्यात यावे, तीची नॉनक्रिमीलेअर चे सर्टिफिकेट ज्यांनी दिले त्यांनासुध्दा बडतर्फ करावे, व पुजा खेडकर यांची ज्या कमीटीने तोंडी मुलाखत घेतली त्या मुलाखत कमीटीवर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, परभणी जिल्हा महिला कार्याध्यक्ष प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील, महिला जिल्हा संघटक वैशाली साळवे, समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सलीम इनामदार, सय्यद खदिर, प्रशांत वाटूरे, खय्यूम बेग, फिरोज खान पठाण, युसुफ पठाण, जिंतूर तालुका अध्यक्ष सय्यद फिरोज, शेख अझहर, हरदिप सिंग बावरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज