परभणीचा भूमी अभिलेख उप अधीक्षक दत्तू सोनवणे ऐसीबी च्या जाळ्यात
परभणीचा भूमी अभिलेख उप अधीक्षक दत्तू सोनवणे लाच घेताना ऐसीबी जाळ्यात
परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी )- येथील भूमी अभिलेख उप अधीक्षक दत्तू सोनवणे यांना एसीबी णे लाच घेताना रांगेहाथ पकडले. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी सन 2004 मध्ये परभणी शहर महानगरपालिका हद्दीत सर्व्हे क्रमांक 303 मध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे. तक्रारदार यांचे प्लॉट करिता नवीन मिळकत क्रमांक देऊन पी.आर. कार्ड बनवून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, परभणी यांनी आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार नवीन मिळकत क्रमांक व पी.आर. कार्ड मिळणे करिता तक्रारदार यांनी उप अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, परभणी यांचे कार्यालयात दि. 29/11/2023 रोजी अर्ज दिलेला आहे. सदर अर्जावरून काम झाले का नाही, याबाबत तक्रारदार यांनी वेळोवेळी आलोसे सोनवणे यांचेकडे विचारणा केली परंतु त्यांना नंतर या असे सांगितले जात होते. दि.07/05/2024 रोजी तक्रारदार यांनी आलोसे सोनवणे यांची भेट घेऊन त्यांचे प्रलंबित कामाबाबत विचारले असता आलोसे सोनवणे यांनी त्यांना 10,000/- रू. लाचेची मागणी केली. ही रक्कम लाच असल्याने व तक्रारदार यांना द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी दि. 27/05/2024 रोजी एसीबी परभणी येथे तक्रार दिली. दिनांक 27/05/2024 रोजी करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान आलोसे सोनवणे यांनी तक्रारदार यांचे प्लॉट करिता नवीन मिळकत क्रमांक देऊन पी.आर. कार्ड देण्यासाठी तडजोडी अंती 7000/- रू. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. आज दि. 03/06/2024 रोजी सापळा कार्यवाही आयोजित करून आलोसे दत्तू सोनवणे, उप अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, परभणी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पो.स्टे. नवामोंढा, परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मार्गदर्शक डॉ .राजकुमार शिंदे भापोसे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेड पर्यवेक्षण अधिकारी अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो सापळा व तपास अधिकारी श्री.बसवेश्वर जकीकोरे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,परभणी
.jpeg)
Comments
Post a Comment