Posts

उद्योग चावडीचे 25 जूनला गंगाखेड मध्ये आयोजन-सुनील गुट्टे

Image
गंगाखेड येथे 25 जूनला या उद्योग चावडीवर... युवा उद्योजक सुनील गुट्टे ह्यांचे पत्रपरिषदेत आवाहन परभणी (प्रतिनिधी)- उदयोग्य करायचा आहे, पण कोणता करावा? त्यासाठी काय-काय करायला हवे? आपल्या भागात कोणता उद्योग करावा? त्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? मार्केटींग कसे करावे? अशा विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत नागरिक व युवकांना योग्य ते मार्गदर्शन करावे, यासाठी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांच्या प्रमुख संकल्पनेतून येत्या २५ जून रोजी पूजा मंगल कार्यालय, गंगाखेड येथे एकदिवसीय 'उद्योग मंथन महा-महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या आयोजन विषयी भूमिका, हेतू, उद्देश, रूपरेषा, नियोजन, अपेक्षा, मार्गदर्शन सत्रे, पूर्व तयारी अशा विविध बाबींवर आज युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांनी ग्रीन लिफ हॉटेल, परभणी येथे पत्र परिषद घेवून सविस्तर माहिती व प्रश्नोत्तरे दिली. तसेच उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्य आयोजक सुनील भैय्या गुट्टे, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे स...

पुणे आकाशवाणी केंद्र वरून बातम्या प्रसारित होणारच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती व प्रसारणमंत्र्यांचे मानले आभार  मुंबई, दि. १५ - आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहेत, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत. पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत. सकाळी ७.१०, ८ वा. ८.३०, १...

शेतकरीवर्गाला फायदेशीर,वनामकृवित द्रवरूप जिवाणू खते विक्रीकरिता उपलब्ध

Image
  वनामकृवित द्रवरूप जिवाणू खते विक्रीकरिता उपलब्ध जिवाणू खतांमुळे  पिकांना दिलेल्‍या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होऊन  पिक उत्‍पादनात   होते वाढ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय मृद जैव विविधता-जैविक खत प्रकल्पामध्ये विविध पिकांसाठी द्रवरूप जिवाणू खते १८ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत, द्रवरूप जिवाणू खताचे दर रु. ३७५/- प्रति लिटर असुन यात रायझोबीयम, अझोटोबक्टर, स्फुरद विरघळवीणारे / वहन करणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळवीणारे जिवाणू खत, गंधक विघटन करणारे व जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) व अझोटोफॉस (अझोटोबक्टर, व पीएसबी मिश्रण) आदींचा समावेश आहे.   पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होण्यास जिवाणू खतांमुळे मदत होते. त्यात रायझोबीयम या नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूमुळे सोयाबीन, मुग, हरभरा, भुईमुग, तूर, उडीद आदी पिक उत्पादनात २० टक्क्यापेक्षा जास्त वाढ होते. अझोटोबक्टर या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन ...

लालपरीचा अमृत महोत्सव वैजापूरात उत्साहात 

Image
लालपरीचा अमृत महोत्सव वैजापूरात उत्साहात  (छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या शहरात लालपरीच्या (एस, टी, बस) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ७५ वर्षे झाल्या प्रित्यर्थ  वैजापूर बस समध्ये  वाहक, चालक , कर्मचारी, अधिकारी यांनी ७५ वर्षावरील प्रवाशांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन केले. महामंडळच्या लौकिकासाठी  प्रवाशांना सौजन्यपूर्ण सेवा पूरऊ, मंडळाचे व बसचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही. महामंडळाच्या सर्वांगीण वृद्धि व विकासासाठी  सर्वतोपरी प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा त्यांना  माजी शिक्षणाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी दिली. लालपरीच्या ७५ वर्षाचा प्रवास कथन केला. आगार प्रमुख किरण धनवटे यांच्या उपस्थितीतीत हा कार्यक्रम झाला. त्यांनी ही प्रवाशांना माहिती दिली. दीप प्रज्वलन, प्रवाशांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार, मिठाई वाटप कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले. या प्रसंगी स्वप्नील पाडवी, वाहतूक निरीक्षक सतीश बावस्कर, वाहतूक सहाय्यक भाऊसाहेब गरुड, लेखाधिकारी किरण राऊत, पंढरीनाथ जाधव, पंडित जानराव, जोगें...

शासन आपल्या दारी' अभियान एक क्रांतिकारी निर्णय : मुख्यमंत्री शिंदे

Image
 कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ   सुमारे दीड लाख लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटींच्या निधीचे वाटप  शासन आपल्या दारी' अभियान एक क्रांतिकारी निर्णय : मुख्यमंत्री शिंदे  छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य शासनाने सुरु केलेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे , कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे , उदय सिंग राजपूत, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पा...

परभणीत कृषी विद्यापीठात खरीप पीक परिसंवाद उत्साहात संपन्न 

Image
परभणीत कृषी विद्यापीठात खरीप पीक परिसंवाद उत्साहात संपन्न  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन ,  मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य. विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन . परभणी (प्रतिनिधी ) - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन ,  मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष आणि आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य साधुन विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप पिक परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात  अमेरिकेतील कनेक्‍टीकट विद्यापीठाचे अधिष्‍ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे,  गुजरात   येथील बन्‍सी गीर गोशाळेचे अध्‍यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया ,  शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले ,  संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर ,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर ,  कृषि अधिका...

सामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू मिळणार - राधाकृष्ण विखे पाटील 

Image
सामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू मिळणार - राधाकृष्ण विखे पाटील  (छ. सं. नगर / प्रतिनिधी ) शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले शासनाने घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार असून गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अवैध वाळू उपसा केल्याने होणारी पर्यावरणाची हानी आता या शासकीय वाळू केंद्रामुळे नक्कीच कमी होणार आहे. या उपक्रमात परिवहन विभागाच...